लोहगाव शिवारात आढळला मृतदेह

लोहगाव ( वार्ताहर )   

 बाभळेश्वर येथील बेपत्ता झालेला तरुणाचा मृतदेह प्रवरा डाव्या कालव्यात नजीक कारखाना परिसरात लोहगाव शिवरात आढळला या तरुणांनी निर्जन ठिकाणी जाऊन विष घेऊन आत्महत्या केल्याची माहिती लोणी पोलीस स्टेशनचे एपी आय योगेश शिंदे यांनी दिले
 कारखाना कर्मचाऱी कामावर येत असताना कॅनलच्या कडेला निर्जन ठिकाणी अनोळखी मृत अवस्थेत दिसला त्या कर्मचारी विखे पाटील कारखाने सुरक्षा अधिकारी नंदकुमार डेंगळे यांना या संदर्भात फोनद्वारे माहिती दिली व डेेंगळ यांनी फोनद्वारे लोणी पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यानंतर लोणी पोलीस स्टेशनचे योगेश शिंदे सुदाम फटांगरे आशिष सय्यद घटनास्थळी आले. लोणी पोलीस स्टेशनला मिसिंग नोंदवलेल्या व्यक्तीला घटनास्थळी बोलवून मृत व्यक्तीची ओळख पटवली सदर व्यक्ती हा बाभळेश्वर येथील विकास गोरक्ष पुरी (वय २७) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे