आधीच वरूणराजा कोपला शेतकऱ्यांवर! त्यातच नगर मनमाड हायवे वरील कॉन्ट्रॅक्टदारही उठला शेतकऱ्यांच्या मुळावर!!

बाभळेश्वर ग्रामस्थांकडून भारत कंट्रक्शन कंपनी वर गुन्हा दाखल करून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई देण्याची मागणी!

लोहगाव ( शरदराव तांबे पाटील)-राहाता तालुक्यात पावसाने सर्वत्र हा हा कार केला असून बाभळेश्वर , निर्मळ पिंपरी परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे .त्यातच बाभळेश्वर ते निर्मळ पिंपरी या महामार्गाचे काम चालू असल्यामुळे  काम करणाऱ्या कंपनीने एका ठिकाणी रस्त्याच्या खालील नळ्याकाढून पाणी जाण्याचा रस्ता( पूर्वीची मोरी )बंद केल्यामुळे एका बाजूला पाणी तुंबून राहते. त्यामुळे शेतीच्या पिकात पाणी घुसून उभ्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. आणखी मुसळधार पाऊस झाला तर नॅशनल हायवे बंद पडण्याची वेळ येणार आहे .तरी ही पाणी जाण्याची नाली( पूर्वीची मोरी) पूर्ववत करावी व संबंधित कंट्रक्शन कंपनीवर कारवाई करावी असा तक्रार अर्ज  लोणी पोलीस स्टेशनला देण्यात आला आहे. या तक्रार अर्जात म्हटले आहे की, बाभळेश्वर  ते निर्मळ पिंपरी दरम्यान नगर मनमाड नॅशनल हायवेचे सध्या काम चालू असून येथे काम करणाऱ्या भारत कंट्रक्शन कंपनीने बाभळेश्वर ते निर्मळ पिंपरी दरम्यान एका ठिकाणी रस्त्याखालून 12 ते 15 फूट रुंदीची व दहा फूट उंचीची पाणी जाण्यासाठी असणारी मोठी मोरी (नाली)बुजून टाकली आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी तुंबून शेतात दोन फूट इतके पाणी साचले आहे. पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे अजून पाऊस झाला तर हे पाणी आणखी तुबूंन हे पाणी हायवे वर येईल व हा मार्गही  बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी ही रस्त्या खालून पाणी वाहून  जाण्यासाठी असणारी मोरी(नाली) पूर्ववत करावी  तसेच  हि नाली बुजवल्यामुळे झालेल्या शेत पिकांचे नुकसान करणाऱ्या कंट्रक्शन कंपनीवर कारवाई करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. या तक्रार अर्जावर नानासाहेब सहादू बेंद्रे, आशिष ज्ञानदेव बेंद्रे, बाळासाहेब ज्ञानदेव बेंद्रे, चंद्रभान पांडुरंग बेंद्रे, उदय सोमनाथ बेंद्रे, ज्ञानदेव सहादू बेंद्रे, सुहास नानासाहेब बेंद्रे, यांची नावे आहेत.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे