सावळीविहीर बुद्रुक सोसायटीची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न!

शिर्डी( प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील सावळीविहीर बु. विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे  पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पा. विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ,सावळीविहीर बु असे नामकरण करण्याच्या ठरावा बरोबरच इतर ठराव बहुमताने संमत करत या सोसायटीची सर्वसाधारण सभा नुकतीच मोठ्या खेळीमेळीत संपन्न झाली. अध्यक्षपदी चेअरमन राजेंद्र जपे होते, तर प्रमुख मान्यवर म्हणून व्यासपीठावर ज्येष्ठ सभासद व मा. पं. स. सदस्य साहेबराव पा. जपे, अ.फ.शेख गुरुजी, अशोकराव आगलावे,पं.स.चे मा. सभापती जिजाबा आगलावे, कृ. उ.बा. समितीचे संचालक शांताराम जपे, उपसरपंच विकास जपे, विठ्ठलराव मातेरे, सुरेश भाऊसाहेब जपे, कैलास सदाफळ, शिवाजी आगलावे,आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रथम सोसायटीचे सचिव संतोष वाघमारे यांनी प्रास्ताविक करत वार्षिक अहवाल, तेरीज ,ताळेबंद, ऑडिट मेमो, वाचन केले. यावेळी ज्येष्ठ सभासद साहेबराव पा. जपे यांनी सावळीविहीर बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीचे पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील विविध कार्यकारी सोसायटी, सावळीविहीर बुद्रुक असे नामकरण करण्याचा ठराव मांडला व त्यास शांताराम जपे यांनी अनुमोदन दिले.व तो बहुमताने संमत झाला. त्याचप्रमाणे साहेबराव पा. जपे यांनी मराठवाड्यात अतिवृष्टी झाली असून पूरग्रस्तांसाठी ग्रामस्थांच्या वतीने मदत करण्याचे आवाहन केले त्याला उपस्थित संचालक ,सभासद व ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला.व ज्यांना मदत द्यायची आहे त्यांनी सचिव संतोष वाघमारे यांच्याकडे देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. हा मदतनिधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लवकरच पाठवण्यात येणार आहे. या सभेत सरपंच ओमेश जपे यांनी सोसायटीचे चेअरमन व्हा. चेअरमन, व संचालक मंडळ आणि सभासदांच्या सहकार्याने संस्थेचा नावलौकिक वाढत आहे. मात्र या संस्थेची  जुनी कौलारू इमारत होती. तेथे कामकाज चालत होते.पण नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सौ शालिनीताई विखे पाटील, डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या सहकार्याने या सोसायटीला नवीन इमारत होत आहे. लवकरच सोसायटीचे तेथे स्थलांतर होणार आहे. त्यामुळे विखे पा.परिवाराचे अभिनंदन करणारा ठराव त्यांनी मांडला.व तो बहुमताने संमत झाला. यावेळी चेअरमन राजेंद्र जपे म्हणाले की, संस्थेच्या सभासदांनी थकबाकी भरली पाहिजे. कारण जे कर्ज भरत नाही थकबाकीत आहे त्यांचे व्याज जे रेगुलर कर्ज भरतात त्यांच्याकडूनच जणू एक प्रकारे वसूल होते.कर्जमाफी होईल या आशेवर न राहाता सभासदांनी वेळेत कर्ज भरले तर संस्था आणखी        नावारूपाला येईल . असे सांगितले. यावेळी जिजाबा आगलावे यांनीही थकबाकीदार कर्जदारांनी एक टप्प्यात, दोन टप्प्यात आपले कर्ज भरावे. मात्र थकबाकी ठेवू नये. असे आवाहन केले. यावेळी जिल्हा बँकेचे शाखाधिकारी वाकचौरे साहेब म्हणाले की कर्जमाफी होईल किंवा थकबाकीदारांवर कारवाई करू नये असा शासनाचा आतापर्यंत कोणताही सूचना अगर  निर्देश नाही. तेव्हा सभासदांनी वेळेवर कर्ज भरावे. नाहीतर नाविलाजाने कारवाई करावी लागेल. असे सांगितले. शेवटी संस्थेचे व्हा सुरेश वाघमारे यांनी आभार मानले. यावेळी संचालक दिलीप भीमराज जपे, सुनील रामदास आगलावे, सुनील साहेबराव आगलावे, राजकुमार विठ्ठल गडकरी, किशोर गोरखनाथ  आगलावे, किसनराव जपे, मारुती मोहन कापसे, आदी संचालकांसह क्लार्क अभिजीत चंद्रकांत वाघमारे,व सोसायटीचे ज्येष्ठ आजी-माजी पदाधिकारी व सभासद ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे