लोणी (प्रतिनिधी )आज दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर हनुमंतगाव येथे नवीन मुख्याध्यापक श्री नवगिरे सर व शिक्षिका सौं कदम मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन शाळेतील शिक्षक श्री मोरे सर व ओम, श्रद्धा राजेंद्र पिंपळे व इतर सर्व विद्यार्थ्यांनी स्वागत केले आम्हाला नवीन शिक्षक मिळवून देण्यासाठी गावातील डायरेक्टर मा.श्री अशोक घोलप सर सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक साहेब व ग्रामस्थ यांनी खूप सहकार्य केले म्हणून सर्वांचे विद्यार्थ्यांनी आभार मानले नवीन शिक्षक मिळाल्यामुळे सर्व विद्यार्थी खुश आहेत. ग्रामस्थांनी मुलांची शिक्षणाची गैरसोय होत असल्याची खंत होतीच ती आता नवीन शिक्षक आल्यामुळे पालकांची चिंता मिटली व पालकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवून आलेला दिसला सर्व कमिटीच्या व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पिंपळे यांनी आभार व्यक्त केले( प्रतिनिधी) साबळे ज्ञानेश्वर
0 Comments