*इंजीनियर उद्योजक , साहित्यिक व समाजसेवक प्रविण उपलेंचवार यांना राष्ट्रीय दर्जाच्या साई कलारत्न समाजभूषण पुरस्कारा जाहीर शिर्डीमध्ये*

प्रतिनिधी नागपूर स्नेहा मडावी 
जागतिक दर्जाचे  तीर्थ  क्षेत्र म्हणुन  प्रसिद्ध असलेले व   साई  बाबा  च्या  स्पर्षा  ने पावन झालेल्या  पवीत्र  भूमि  शिरडी  येथे  3 मे रोजी  ओम साई  विकास प्रतिशठान व बि बि सि फिल्म  production  च्या  पुढाकाराने साई  कलारत्न समाजभूषण  पुरस्कार  या राष्ट्रीय पुरस्काराचा  वितरण  समारंभ सिद्धी  संकल्प   लाण ( lawn  )  ,शिर्डी अहमदनगर  रोड  , साकुरि  , शिर्डी या परिसरात भव्य दिव्य अशा रंगीबेरंगी लाईट  च्या  लखलखित  झमगाटात  सायंकाळी  6 ते  10 या वेळेत  मोठ्या दिमाखाने संपन्न होणार  आहे. या वेळी  हा पुरस्कार  नागपूर   येथे असणारे प्रसिद्ध व्यावसायिक  , इंजिनियर  , साहित्यिक  व  समाजसेवक  अशा विविध  भूमिका  निभावनारे श्रीयूत  प्रविण उपलेंचवार  यांना प्रदान  करण्यात येणार आहे. श्री प्रविण उपलेंचवार यांनी आज पावेतो  150 पेक्षा जास्त विविध कविता लिहून विविध कार्यक्रमात सादर केलेल्या  आहे. त्यांनी  सुसाट  नावाची 400 पानाची कादंबरी पण  लिहिली आहे. व  तसेच  तरंग  मेहनदि चे  या अल्बममध्ये 18 गीते लिहून त्याला संगीत पण दिले आहे. प्रविण उपलेंचवार हे  मागील  सहा महिन्यापासून  विदर्भ  प्रांतपाल  , मराठी  साहित्य  मंडळ  या राष्ट्रीय मंडळाचा  पदभार  सांभाळून  , त्यांच्या कारकिर्दीत नागपूर येथे  प्रथमच झालेले अखिल  भारतीय  मराठी साहित्य  संमेलन  तसेच  राज्यस्तरीय काव्य संमेलन व  पुरस्कार सोहळा  या  दोन  भव्य कार्यक्रमाचे त्यांच्या सहकारयाच्या  सहकार्याने यशस्वी पणे आयोजन केले आहे. तसेच प्रविण उपलेंचवार हे  अनेक सामाजिक संस्थांच्या  विविध सामाजिक प्रकल्पात मागील  35 वर्षांपासून सतत सहभागी असतात . व  दरवर्षी 900 गरीब विद्यार्थ्यांच्या  संपूर्ण विकासाच्या  मागील 50 वर्षांपासून  सुरू असलेल्या त्यांच्या वडीलांच्या भव्य समाजसेवी प्रकल्पात त्यांचा नित्य सहभाग असतोच. श्री प्रविण उपलेंचवार  यांना 3  मे ला  दिल्या  जाणारया या  पुरस्कार सोहळ्याचे पुरस्कार वीतरण  पुणे  येथेल नामांकित  दिग्दर्शक  , निर्माते  व अभिनेते   काळाराम   ढोबळे  जी  , तसेच संपूर्ण महाराष्ट्र चे लक्ष वेधुन घेणारया  नामांकित मॉडेल व अभिनेत्री सोनी वासनिक  जी, नागपूर व  इतर अनेक  मान्यवराच्या  हस्ते होणार आहे . हा संपूर्ण सोहळा यशस्वी होण्यासाठी श्री सुदाम संसारे  जी व त्यांची संपूर्ण चमू अहोरात्र राबत आहे.  
     तसेच श्री प्रविण उपलेंचवार यांना त्यांच्या 35 वर्षाच्या  अखंड  व्यावसायिक  उन्नत कारकिर्दीसाठी, मनुष्यबळ  विकास लोकसेवा अकादमी  संस्थेच्या प्रेरणेने , राज्यस्तरीय गुणीजण  गौरव पुरस्कार 2024 या दिनांक 5 मे  रोजी,पंडित पलुसकर  सभागृह ,  पंचवटी  नासिक  येथे सकाळी 10 ते 2 यावेळेत साजरया  होणार्‍या सोहळ्यात ' राज्यस्तरीय आदर्श व्यावसायिक उद्योजकता पुरस्कार 2024' या नामांकित पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे . या सोहळ्यात  अनेक  नामांकित  व मान्यवर पाहुणे असणार आहे.  अशा रीतीने प्रविण उपलेंचवार  यांना  मिळणारया विविध क्षेत्रातील कामगिरी  च्या नामांकित दोन्ही पुरस्कारामुळे त्यांच्यावर चहूकडे चाहत्यांच्या  कौतुकाचा  वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे