सावळीविहीर (राजकुमार गडकरी)- कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवा सुविधेसाठी फिरता दवाखाना सुरू करण्यात आला आहे. तालुका व परिसरातील गावांमध्ये वाड्या, वस्त्यांवर त्यामुळे आरोग्य सुविधेची मोठी सोय होणार आहे . त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमधून मोठे समाधान व्यक्त होत आहे. यासाठी आत्मा मलिक हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या वतीने आधुनिक उपकरणे व अत्याधुनिक सोयी सुविधा असणारी सुसज्ज अशी एक मोबाईल बस सेवा नुकतीच सुरू करण्यात आली असून मध्ये वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय सेविका, वैद्यकीय सेवक, परिचारक व प्रशिक्षित चालक अशा संपूर्ण टीमसह सर्व आरोग्य सुविधा ,सेवा या फिरता दवाखाना बस मध्ये उपलब्ध होणार आहे. अशी माहिती आत्मा मालिक हॉस्पिटलचे डॉक्टर मयूर शिंदे यांनी येथे माध्यमांशी बोलताना दिली.
त्यांनी पत्रकारांशी बोलताना पुढे सांगितले की, आत्मा मलिक हॉस्पिटल मध्ये आपत्कालीन सेवा ,प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व नर्सिंग स्टाफ ,ऑक्सिजन सुविधा, अत्यावश्यक औषधे व सतत उपलब्ध ओ पी डी सेवा, जनरल मेडिसिन ओपीडी, विभाग सर्जरी ओपीडी, ऑर्थो ओपीडी साप्ताहिक स्पेशलिस्ट डॉक्टर भेट, आय सी यु क्रिटिकल केअर अत्याधुनिक आयसीयू वेली लेटर सुविधा मॉनिटरिंग सिस्टीम, प्रशिक्षित आयसीयू स्टाफ, नवजात बालकांसाठी प्रथमोपचार ,एन आय सी यु, ऑपरेशन थिएटर ,ओटी पूर्णपणे आधुनिक, ओटी जनरल व छोटी मोठी शस्त्रक्रिया, सर्व आधुनिक उपकरणासह निर्जंतू वातावरण. लॅबोरेटरी, रक्त तपासणी, मूत्र तपासणी, शुगर, हिमोग्लोबिन, यूरिक ॲसिड, इतर सर्व आवश्यक तपासण्या. एक्स-रे व सोनोग्राफी सुविधा, डिजिटल एक्स-रे ,सोनोग्राफी ,कलर सुविधा ,औषधी वितरण 24 तास मेडिकल स्टोअर, डॉक्टरने दिलेल्या सर्व औषधांची उपलब्धता ,फिरता दावाखाना मोबाईल हॉस्पिटल सर्विस, ग्राम पातळीवर नियमित आरोग्य तपासणी ,बीपी ,शुगर, प्राथमिक उपचार ,औषध वितरण ,गंभीर रुग्णांसाठी रुग्णवाहिका व रेफरल सेवा. विमा योजना अंतर्गत उपचार, महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान
भारत योजना पात्र रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार. मोफत आरोग्य सेवा गावागावात घराजवळ या उपक्रमांतर्गत रुग्णांना मिळणाऱ्या प्रमुख सेवा बीपी तपासणी शुगर तपासणी प्राथमिक उपचार, आवश्यक औषधे, संपूर्ण मोफत मिळणार आहे. गंभीर रुग्णांसाठी रेफर सुविधा ग्रामीण दुर्गम भागातील गरजू दिव्यांग वृद्ध व आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे .तपासणी दरम्यान एखादा गंभीर आजार निदर्शनास आल्यास त्या रुग्णास आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये माफक दरात ,व अल्प दरात किंवा महात्मा फुले जन आरोग्य सेवा व आयुष्यमान भारत योजना अंतर्गत मोफत उपचार दिले जाणार आहे. तरी या सुविधांचा व हॉस्पिटलच्या सेवेचा गरजू रुग्ण ,नातेवाईकांनी लाभ घ्यावा. असे ट्रस्टचे अध्यक्ष श्री नंदकुमार सूर्यवंशी यांनी आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे आत्मा मलिक हॉस्पिटलच्या वतीने नुकताच फिरता दवाखाना सुरू करण्यात आला असून
गाव पातळीनुसार या फिरता दवाखान्याचे वेळापत्रका नुसार काम चालणार आहे. आठवड्याला ठरलेल्या दिवशी त्या त्या गावात नियमित सेवा राहणार आहे.फिरता दवाखाना बस खालील प्रमाणे प्रत्येक आठवड्यातील निश्चित वार व वेळेनुसार त्या त्या गावांमध्ये भेट देणार असून दर सोमवारी
रुईला सकाळी 10 ते 12 तर
शिंगवे येथे दुपारी12.30 ते 02.30. दर मंगळवारी जवळके येथे सकाळी 10 ते 12.व बहादरपूरला दुपारी 12.30 ते 02.30. व सायाळे येथे दुपारी 3 ते 05.30. हा फिरता दवाखाना राहणार आहे.
बुधवारी खंबाळा येथे सकाळी 10 ते 12 व धोत्रे येथे दुपारी 12.30 ते 02.30. तर खोपडी ला दुपारी 3 ते 05.30 येथेही हे मोबाईल आरोग्य वाहन जाणार आहे.व आरोग्य सेवा देणार आहे.
गुरुवारी सावळीविहीरला सकाळी 10 ते 12. व कनकुरीला दुपारी 12.30 ते 02.30 व नांदूरखी येथे दुपारी 3 ते 05.30 हा फिरता दवाखाना राहणार आहे.तर
शुक्रवारी पिंपळवाडीला सकाळी 10 ते 12 व एकरूखेला दुपारी 12.30 ते 02.30 रामपूर वाडीला दुपारी 3 ते 05.30 या वेळेला ही सेवा राहणार आहे.
रविवारी दहेगाव पिंपळस .केलवड. येथे सकाळी 10 ते 12 व खडकेवाके दुपारी 12.30 ते 02.30 तक्ष निर्मळ पिंपरीला दुपारी 3 ते 05.30 यावेळेस हा फिरता दवाखाना राहणार आहे.या
फिरता दवाखाना सेवेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्या त्या गावातील ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासन यांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे हॉस्पिटल मार्फत कळविण्यात आले आहे.तरी या संधीचा सर्व ग्रामस्थांनी व ग्रामीण भागातील रुग्णांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन आत्मा मालिक हॉस्पिटल कोकमठाण यांच्यावतीने डॉक्टर मयूर शिंदे व हॉस्पिटल व्यवस्थापनांच्या वतीने करण्यात आले आहे .
0 Comments