अविनाश भाऊसाहेब निकम यांची जपानी येथील कंपनीत नियुक्ती!--सावळीविहीरला करण्यात आला त्यांचा सन्मान!

शिर्डी ( प्रतिनिधी )- राहाता तालुक्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या सावळीविहीर बुद्रुक सारख्या गावात आपली जिद्द व मेहनतीने  शिक्षण घेत थेट नोकरी निमित्ताने जपान सारख्या देशांमध्ये भरारी मारणाऱ्या अविनाश भाऊसाहेब निकम याचा सावळीविहीर  बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने सरपंच ओमेश साहेबराव जपे यांनी यथोचित सत्कार करत पुढील जीवनासाठी त्यास शुभेच्छा दिल्या. राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील माजी सरपंच बुद्धवाशी भीमराज दगडू जाधव यांचे नातू ,  साई संस्थांनला नोकरीला असणारे भाऊसाहेब विनायक निकम व सौ. मनीषा भाऊसाहेब निकम यांचे चिरंजीव अविनाश याचे लहानपण सावळीविहीर बुद्रुक  येथे गेले. शालेय शिक्षणही येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये झाले.तसेच बारावी सायन्स हे एस एस जी एम कॉलेज कोपरगाव येथे होऊन संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केली सर्व ठिकाणी त्यांनी गुणवत्तेत येत आपले नाव मिळवले. सन 2025 ला एमटेक पूर्ण करून जपानी भाषा ही त्यांनी अवगत केली. त्याचे जपान येथील टोकियो येथील एका उच्च दर्जाच्या कंपनीमध्ये नोकरीसाठी नेमणूक झाली असून 11 नोव्हेंबर 2025 रोजी अविनाश जपानला टोकियो येथे जाणार आहे. ग्रामीण भागातून प्रदेशात तेही जपान सारख्या देशांमध्ये नोकरी निमित्ताने नियुक्ती होऊन तेथे नोकरीसाठी अविनाश निकम हा जात असल्यामुळे तो निकम परिवार त्याचप्रमाणे जाधव परिवार तसेच सावळीविहीर बुद्रुक गावाचाही मोठा अभिमान आहे. त्याचा सन्मान सरपंच ओमेश साहेबराव जपे यांनी नुकताच केला. त्याला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अंमळनेर येथे पंचायत समितीत मुख्य अभियंता असणारे दीपक रामभाऊ डोखे व सौ सुगंधा दीपक डोखे, हे उपस्थित होते. अविनाशचे साई संस्थांनचे कामगार अधिकारी शरदराव डोखे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर योगेश डोखे, तसेच सर्व निकम परिवार ,जाधव परिवार, डोखे परिवार तसेच सावळीविहीर बुद्रुक येथील सर्व ग्रामस्थांच्या वतीने अविनाश निकम यांचे अभिनंदन करण्यात येत असून पुढील भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत  आहेत. यावेळी सरपंच ओमेश जपे यांना आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल दीपक राव डोखे यांनी सरपंच  जपे यांचा शाल देऊन सत्कार केला. यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य, नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!