संभाजीनगर ( शरदराव तांबे)-आशिया खंडात सर्वात मोठा समजला जाणारा सद्गुरु योगीराज श्री गंगागिरीजी महाराज 178 वा अखंड हरिनाम सप्ताह नुकताच शनिदेव चेंडूफळ बाजाठाण हमरापुर आवलगाव भामाठाण कमलपूर आदी सप्तकृषी गावांमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या अखंड हरिनाम सप्ताह साठी मोठा खर्च येतो. मात्र मोठी देणगी भाविक देतात व त्यातून हा खर्च केला जातो. यापूर्वी या अखंड हरिनाम सप्ताहाची गिनीज बुकातही नोंद झालेली आहे. यावर्षी हा सप्ताह शनी देवगाव व सप्त कृषीत झाला. लाखो लोकांनी येथे भेट देऊन धार्मिक कार्यक्रमाचा महाप्रसादाचा लाभ घेतला. हा यावर्षीचा सप्ताह संपन्न झाल्यानंतर नुकतेच सद्गुरु गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचा हिशोब होऊन शिल्लक राहिलेली रक्कम रुपये 42 लाख 28 हजार 834 ही गोदाधाम सरला बेट संस्थांनचे महंत व हिंदू धर्म रक्षक गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराज यांच्याकडे धनादेशाने सुपूर्त करण्यात आली. असे समजते. सध्या सरला बेट येथील सद्गुरु गंगागिरीजी महाराज मंदिर व परिसराचा व गोदाधामचा विकास करण्यात येत आहे. त्यासाठी हा निधी वापरला जात असतो असे समजते.
मात्र यावर्षी सप्त कृषी व जिल्ह्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टी मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची पिके गेली आहेत. गायांचे गोठे, त्यांचे घरे उद्ध्वस्त झाली आहेत. रस्ते उखडले आहेत. मोठे नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त भागांना या अखंड हरिनाम सप्ताहाच्या शिल्लक राहिलेल्या निधीतून, ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर परिसराच्या विकासाबरोबरच अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना काही प्रमाणात का होईना मदत करण्यात यावी .अशी मागणी आता भाविक व या परिसरातील शेतकरी, नुकसानग्रस्त नागरिकांकडून होत आहे.
0 Comments