याबाबत सविस्तर वृत्त असे की रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय प्रवरानगर विद्यालयाची नावलौकिक असताना एक आदर्श शाळा म्हणून या शाळेकडे पाहिल जाते. जिल्हाबाहेरील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेण्यासाठी येत असतात या शाळेने अनेक विद्यार्थी घडवली आहे व मोठमोठ्या पदावर कार्यरत असताना आज माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे अंधाराचा फायदा घेत शाळेत येऊन शाळेचे मोठे नुकसान केली. यामध्ये सी,सी,टीव्ही कॅमेरे, इलेक्ट्रिक लाईट तसेच शाळेच्या वृक्ष लागवड केलेल्या कुंड्या व इतरही वस्तूची मोडतोड त्यांनी शुक्रवारी रात्री केलेली असून या संदर्भात लोणी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क केला असता एकूण 6 विद्यार्थी हे अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस कर्मचाऱ्यांकडून मिळाली आहे.
सध्या शाळेत इयत्ता दहावीचे पेपर चालू असून त्या 6 पैकी 1 विद्यार्थी सध्या दहावीचे पेपरला बसलेला आहे मग या विद्यार्थ्यांनी शाळेचे नुकसान का केले ? असा प्रश्न सध्या नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे असून या विद्यार्थ्यांनी रात्रीच्या वेळी येऊन शाळेच्या आवारात बसवणारे सीसीटीव्ही कॅमेरे व इलेक्ट्रिक वस्तू यांचे नुकसान करण्याचे कारण तरी काय व यावेळी शाळेतील नाईट ड्युटीवर असणारे शिपाई काय करत होते असे ही प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत सदर घडलेली घटना एक भयंकर सत्य असून पोलिसांनी या विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन याबद्दल खोलवर जाऊन खुलासा होणे गरजेचे आहे व परीक्षा संपल्यावर किंवा शाळा सुटल्यावर शाळेच्या गेटबाहेरील जे टुकार मुले टू व्हीलर घेऊन गाड्या जोरात रेस करत एका गाडीवर तीन ते चार जण बसून जोरजोरात गाड्या पळवून स्टंटबाजी करत असल्याचेही आढळून येत आहे .असे ही दबक्या आवाजात सध्या परिसरातील आवारात चर्चा चालू आहे .जर या विद्यार्थ्यांना व बाहेरील टूकार मुलांना शिक्षा नाही मिळाली तर असे घडलेले प्रकार येथून पुढे सातत्याने होत राहतील मग याला जबाबदार कोण ?असा ही प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शिस्त लावायचीच नाही का ? शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिस्त लावल्यामुळे शाळेला अशी मोठी किंमत मोजावी लागत असेल तर मग याला जबाबदार कोण पालक की शिक्षक असाही प्रश्न सध्या चर्चेला घेतला जात असल्यामुळे अशा घडणाऱ्या घटनांमुळे शाळा महाविद्यालय मध्ये सध्या विद्यार्थिनी, विद्यार्थी व शिक्षकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे त्यामुळे अशा घडणाऱ्या घटनांना वेळीच शाळेच्या व्यवस्थापना सह पोलिसांनी यामध्ये लक्ष घालून अशा घटना न होण्यासाठी पाय बंद घालावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होताना दिसत आहे.
0 Comments