मुरबाड, दि. १०(बाळासाहेब भालेराव) भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी काढलेल्या भव्य रॅलीला ठाणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष तथा भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांना निवडण्यासाठी तसेच मुरबाड मधून मोठ्या प्रमाणात लीड देण्यासाठी शिवसेना शिंदे गटासह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठी कंबर कसल्याचे चित्र दिसून येत आहे.
यावेळी भाजपा आमदार किसन कथोरे, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील,शिवसेना राज्याचे उपनेते प्रकाश पाटील, शिवसेना ठाणे उपजिल्हाप्रमुख रामभाऊ दळवी, ठाणे जिल्हा चिटणीस कांतीलाल कंटे, मुरबाड तालुका प्रमुख प्रकाश पवार, जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पवार, अनिल देसले, महिला प्रमुख रेखा ईसामे, बाजार समिती माजी सभापती मनोहर ईसामे, यांच्यासह शिवसेना शिंदे गटासह कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना निवडून आणण्यासाठी मोठी कंबर कसली आहे त्याचबरोबर त्यांना मुरबाड तालुक्यातून शिंदे गटासह महायुतीच्या वतीने मोठ्या प्रमाणात लिड देण्यासाठी निर्धार करण्यात आला आहे. त्यामुळे शिवले येथे नाक्यावरती भव्य रॅली द्वारे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना शिवसेना शिंदे गटाच्या वतीने अर्थात भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांनी कार्यकर्ते नावान केले कोणत्याही परिस्थितीत कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात जाऊन प्रत्येक माणसाला महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आहेत त्यांना निवडण्यासाठी आपल्याला यावेळी साथ द्यायची आहे अशा प्रकारचे वातावरण निर्मिती करा आणि मला खात्री आहे निश्चितच महायुतीचे उमेदवार कपिल पाटील हे मोठ्या प्रमाणात मुरबाड मधून लीड घेतील आणि विजयाचा शिक्कामोर्तब करतील असे शुभ संकेत सुभाष पवार यांनी यावेळी दिले.
0 Comments