एका सामान्य महिलेचा कायद्यांसाठी असणारा लढा अखेर यशस्वी!चक्क पोलीस पाटलाला बसवले घरी!

लोहगाव ( प्रतिनिधी)
एका सामान्य महिलेचा कायद्यासाठी असामान्य असा लढा अखेर यशस्वी झाला . कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या अश्या‌ तीन अपत्ये असणाऱ्या  पोलीस पाटीलला या लढ्यामुळे आपले पद सोडावे लागले.
महाराष्ट्रात छोटे कुटुंब कायदा तयार होऊन सुमारे वीस वर्षे झाली परंतु त्या कायद्याचा आज देखील पाहिजे तेवढा धाक अधिकारी-कर्मचारी यांना नाही. मात्र महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील व्हळे शेलगाव या ठिकाणची एक रणरागिणी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनालाच भिडली.
        याची हकीकत अशी की, व्हळे शेळगाव तालुका बार्शी येथील जागरूक नागरिक सौ. राणी सचिन व्हळे यांना सन 2023 च्या दिवाळीमध्ये असे निदर्शनास आले की, त्यांच्या गावच्या पोलीस पाटील सौ वनमाला योगेश व्हळे या यांना 2005 नंतर तीन अपत्य  झालेली आहेत . जागरूक नागरिक या नात्याने राणी व्हळे यांनी संबंधित  पोलीस पाटील यांना तीन अपत्ये असल्याबाबतचे अधिकृत शासकीय पुरावे, माहिती ही माहिती अधिकारातून तात्काळ गोळा केली.आणि जानेवारी 2024 रोजी त्यांनी माननीय जिल्हाधिकारी सोलापूर  यांना छोटे कुटुंबाचे कायद्याचे उल्लंघन झाल्याबाबत आणि संबंधित पोलीस पाटील यांना बडतर्फ करणेबाबत तक्रार दिली. यामध्ये प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री सदाशिव पडदुने यांनी 27 फेब्रुवारी 2024 रोजी सुनावणी घेतली .यामध्ये संबंधित पोलीस पाटील आणि जागरूक नागरिक राणी व्हळे यांनी त्यांचे म्हणणे मांडले. यामध्ये राणी व्हळे यांचे पुरावे ग्राह्य धरून प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुने साहेब यांनी संबंधित पोलीस पाटील सौ. वनमाळा योगेश व्हळे यांना बडतर्फ करून त्यांना यापुढे कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय नोकरीमध्ये उमेदवार म्हणून अर्ज दाखल करता येणार नाही. असे स्पष्ट आदेश  मार्च 2024 मध्ये दिले
           एका सामान्य जागरूक महिले ने कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांना कायदा पाळायला भाग पाडण्यासाठी सुमारे चार ते पाच महिन्यांमध्ये पाठपुरावा करून यशस्वीपणे लढा दिला आणि जिंकला देखील! या सर्व लढाई मध्ये त्यांना अनेकांनी सहकार्य केले. या महिलेचे बार्शी तालुका व परिसरातून कौतुक होत आहे. त्याचप्रमाणे या महिलेची प्रेरणा घेऊन अनेकांनी 2005 नंतर झालेली तीन अपत्ये बाबत तक्रारी देऊन संबंधितांना बडतर्फ करण्याचे अर्ज अनेक ठिकाणी दिलेले आहेत. सदरच्या सौ राणी सचिन व्हळे यांनी सर्वांना विनंती केली आहे की अशा प्रकारे 2005 नंतर कोणत्याही अधिकाऱ्याला अथवा कर्मचाऱ्याला तीन अपत्य झालेले असेल तर त्यांच्याविरुद्ध तात्काळ वरिष्ठांना तक्रारी देऊन त्यांना बडतर्फ करण्याचे योग्य त्या तक्रारी पुराव्यासह आपण संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठांना तात्काळ द्यावेत.  त्यांनी सर्व महाराष्ट्रातल्या नागरिकांना विशेषतः महिलांना ‌ही विनंती केलेली आहे. अशा जागृत महिला यांची आज गरज असून कायदा मोडणाऱ्यांना धडा शिकवणे गरजेचे असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे