श्रावणी तिसरा सोमवार ,नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन यामुळे सर्वत्र मोठा उत्साह! श्री महादेव मंदिरा मध्ये दिवसभर भाविकांचीदर्शनासाठी मोठी गर्दी!!

शिर्डी ( प्रतिनिधी )श्रावणी तिसरा सोमवार, नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन सण सर्वत्र मोठ्या उत्साहात, विविध कार्यक्रमाने ठीक ठिकाणी राहाता तालुक्यात साजरा करण्यात आले.
श्रावणी तिसऱ्या सोमवार निमित्त राहता तालुक्यातील विविध श्री शंकराच्या मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून येत होती. विशेषता महिला भाविकांची संख्या त्यामध्ये जास्त असल्याचे दिसून येत होते. लोणी संगमनेर रस्त्यालगत असणाऱ्या श्री.निझ्ररणेश्वर मंदिरातही  दर्शनासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. येथे दर्शनासाठी रांगा लागल्याचे दिसून येत होते. येथे हार प्रसाद खेळण्याची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली होती. यात्रेचे स्वरूप येथे प्राप्त झाले होते. हिरव्यागार वनराईत असणारे हे अतिशय निसर्गरम्य व मनोहरी मंदिर असल्याने तेथे दिवसभर भाविकांची संख्या मोठी वाढली होती. त्याचप्रमाणे राहता तालुक्यातील श्री पंचकेश्वर मंदिर, निर्मळ पिंपरी येथील श्री महादेव मंदिर, व विविध गावांमध्ये असणाऱ्या श्री महादेवाच्या मंदिरात भाविक विशेषता महिला भाविक शंभू महादेवाची पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये पहाटेपासूनच येत असल्याचे दिसत होते. दिवसभर मंदिरे भाविकांनी गजबजली होती. शिर्डी नाशिक रस्त्यावर वावी मिरगाव परिसरात असणारे श्री ईशानेश्वर हे एक प्रसिद्ध असे श्री महादेवाचे मंदिर असून मंदिर‌ हे निसर्गरम्य‌ व  सुंदर अशा वातावरणात असून या श्री ईशानेश्वर मंदिरात सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. येथे जणू यात्रेचे स्वरूप दिसून येत होते. अनेक ठिकाणी श्रावणी तिसऱ्या सोमवार निमित्त उपवास असल्याने ठिकठिकाणी चहा, खिचडी, केळी, फराळाचे भाविकांना वाटप करण्यात येत होते. तसेच सोमवारीच रक्षाबंधन हा सण असल्यामुळे आपल्या भावाला ओवाळण्यासाठी बहिणींची मोठी लगबग सुरू होती. ठिकठिकाणी विविध प्रकारच्या राख्या दुकानात विक्रीसाठी दिसून येत होत्या.  श्रावणी तिसरा सोमवार, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन असे आल्यामुळे फळे, फुले महागली होती. दिवसभर मोठा उत्साह सर्वत्र दिसून येत होता. राहता, शिर्डी, लोणी , कोल्हार,बाभळेश्वर आदी बाजारपेठाही गर्दीने फुलल्याचे दिसून येत होते.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे