महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघाची कोल्हार येथे बैठक संपन्न! राहता तालुका युवा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार सुभाष कोंडेकर व उपाध्यक्षपदी पत्रकार राजकुमार गडकरी यांची निवड!

कोल्हार( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य युवा ग्रामीण पत्रकार संघाची नुकतीच राहाता तालुक्यातील कोल्हार येथे मोठ्या उत्साहात बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये राहाता तालुका युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कोल्हार येथील पत्रकार सुभाष कोंडेकर यांची तर उपाध्यक्षपदी शिर्डीचे पत्रकार राजकुमार गडकरी यांची एकमताने निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या सूचनेनुसार नाशिक विभाग प्रमुख शरदराव तांबे व जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राहता तालुका युवा ग्रामीण पत्रकार संघाची नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत विविध विषयावर व पत्रकारांच्या विविध समस्यांवर तसेच नांदेड येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अधिवेशनासंदर्भातही सविस्तर चर्चा झाली. तसेच यावेळी राहता तालुका युवा ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी राहता तालुका युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कोल्हार येथील पत्रकार सुभाष कोंडेकर यांची तर उपाध्यक्षपदी शिर्डीचे पत्रकार राजकुमार गडकरी यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच सचिव म्हणून किरण राऊत, तालुका समन्वयक म्हणून प्रतिक केदार ,खजिनदार म्हणून रवींद्र धस यांचीही निवड यावेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे राहता तालुक्यातून व अहमदनगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने महाराष्ट्र राज्य युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या नांदेड येथील अधिवेशनाला अहिल्यानगर जिल्ह्यातील व  राहता तालुक्यातील पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे. असे यावेळी आवाहान करण्यात आले.
राहता तालुका युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे तालुक्यातून जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे