भारतीय दलित महासंघ तसेच हिंदू रक्षक धर्म परिषदेच्या वतीने महात्मा गांधी विद्यालय प्रवरानगर येथील विद्यार्थिनींना शालेय साहित्य व गणवेश वाटप!

लोहगाव( प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयातील मुलींना नुकतेच शालेय गणवेश व शालेय साहित्य देण्यात आले.
भारतीय दलित महासंघ उत्तर नगर जिल्हा अध्यक्षा सौ हिनाताई उबाळे तसेच हिंदू रक्षक धर्म परिषद, धार्मिक व सामाजिक संघटना अहमदनगरचे उपाध्यक्ष भिका भाऊ गागरे व कार्यकर्त्या सौ अनिताताई गोरे ,नितीन भाऊ भोसले, भारतीय दलित महासंघाचे राहता तालुका अध्यक्ष सागर भाऊ उबाळे आदी मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी विद्यालयातील मुलींना गणवेश तसेच शालेय साहित्य 13 ऑगस्ट 2024 रोजी देण्यात आले. भारताचा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन दोनच दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हे शालेय साहित्य व गणवेश देण्यात येत असल्याचे यावेळी या दानशूर व्यक्तींनी सांगितले. यावेळी प्राचार्य, शाळेतील शिक्षक व शिक्षिका, विद्यार्थी तसेच भारतीय दलित महासंघ हिंदू रक्षक धर्म परिषद चे कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
शालेय गणवेश व शालेय साहित्य मिळाल्याबद्दल या विद्यालयातील मुलींकडून मनोमन समाधान व्यक्त होत आहे. शाळेतील मुली तसेच शिक्षकांनी शालेय गणवेश व शालेय साहित्य देणाऱ्या या दानशूर अशा व्यक्तींचे ,संघटनेचे यावेळी धन्यवाद मानले.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे