महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आधारस्तंभ पुरस्कार मधुकर अनाप यांना जाहीर



राहाता (प्रतिनिधी) राज्यात अतिशय मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,महाराष्ट्र राज्याचा अंधश्रद्धा निर्मूलन  वार्तापत्राच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आधारस्तंभ पुरस्कारासाठी अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील सोनगाव अनापवाडी येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर शहाजी अनाप यांची या वर्षीच्या आधारस्तंभ पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून मधुकर अनाप हे महाराष्ट्रअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते असून त्यांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ.पी.बी.कडू पाटील, प्रा.विनायक बंगाळ, डॉ.मच्छिंद्र वाघ,नागेश कुसळे यांचे सोबत विविध मोहिमेत सहभाग नोंदविला आहे. त्याचप्रमाणे सामाजिक आणि पर्यावरण विषयक कार्यात ही त्यांचा मोठा सहभाग आहे. शाळा महाविद्यालयातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी त्यांनी आतापर्यंत अनेक प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले असून बुवाबाजी विरुद्धच्या मोहिमेतही विशेष सहभाग नोंदविला आहे.त्याचप्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा जिल्ह्यात प्रचार,प्रसार करण्यातही त्यांचा मोठा सहभाग आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र तर्फे आधारस्तंभ पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.हा पुरस्कार त्यांना दि.१४ व १५ सप्टेंबर रोजी रायगड येथील वडगरच्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, येथे देण्यात येणार असून यावेळी साप्ताहिक साधना,पुणेचे संपादक विनोद शिरसाठ,पत्रकार अलोक देशपांडे इंडियन एक्सप्रेस,मुंबई, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक राजीव तांबे,अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे मुख्य संपादक राहुल थोरात, मुक्ता दाभोलकर, डॉ.हमीद दाभोलकर, सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या प्रमुख  मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.मधुकर अनाप याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू महाराष्ट्र अनिस ज्येष्ठ कार्यकर्ते हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोळकर,राहुल थोरात,राजीव देशपांडे मिलिंद देशमुख,प्रशांत पोतदार,नंदिनी जाधव,गणेश चिंचोले,अण्णा कडलास्कर, डॉ.संजय लड्डा,अहमदनगर शहर अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे आदींनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे