वेदांत आणि आत्मिक ज्ञानाची अनुभूती मिळण्यासाठी अध्यात्मिक कार्यशाळा किंवा साधना आवश्यक-हरिद्वारचे वेदांतचार्य स्वामी गिरीधरजी महाराज

शिर्डी (प्रतिनिधी) मनुष्य व भक्तगणांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी संत आणि अध्यात्मिक मार्गदर्शन महत्त्वाचे असून ते नर्मदेश्वर सेवाधाम मधून अहोरात्र केले जात आहे व त्यातच मोठे समाधान मिळते. असे सांगत हरिद्वार येथे वेदांतचार्य स्वामी गिरिधरजी महाराज यांची आपण भेट घेऊन भारतीय तत्त्वज्ञान, वेदांत आणि अध्यात्माच्या गुढ विचारांवर व आत्मिक आणि धार्मिक या विषयावर नुकतीच हरिद्वार येथे गहन चर्चा केली. त्याचा फायदाही सर्वसामान्य मनुष्याला व भक्तगणांना नक्कीच होणार असून आपल्या भक्तांसाठी आणि समाजासाठी अध्यात्मिक जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम आम्ही दोन्ही संतांनी हाती घेतले असल्याचे मत  नर्मदेश्वर सेवाधाम आश्रमांचे महंत अशोक महाराज निर्मळ उर्फ आत्माराम गिरी यांनी दैनिक छत्रपती एक्सप्रेस शी बोलताना व्यक्त केले.
   श्री नर्मदेश्वर सेवाधामचे महंत अशोक महाराज निर्मळ उर्फ आत्मारामगिरीजी  महाराज हे सध्या आपल्या 28 भक्तांसोबत उत्तराखंड मधील यमुनोत्री ,गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ चार धाम यात्रा करत असून त्यांनी नुकतीच हरिद्वारचे वेदांतचार्य स्वामी गिरीधरजी महाराज यांची भेट घेऊन आत्मिक आणि धार्मिक तसेच अध्यात्माच्या गुढ विचारांवर गहन चर्चा केली. या चर्चेच्या माध्यमातून आत्मिक आणि अध्यात्मिक ज्ञानातून सदैव भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी नर्मदेश्वर सेवाधामच्या माध्यमातून सदैव प्रयत्न प्रयत्न राहणार असल्याचेही यावेळी महंत आत्माराम गिरीजी महाराज यांनी सांगितले. हरिद्वारचे वेदांताचार्य स्वामी गिरिधरजी महाराज यांची भेट घेतली. मोठे आत्मिक समाधान लाभले.या भेटीचा मुख्य उद्देश आत्मिक आणि धार्मिक चर्चा करणे हा होता.  भारतीय तत्त्वज्ञान, वेदांत, आणि अध्यात्माच्या गूढ विचारांवर गहन चर्चा झाली. 
स्वामी गिरिधरजी महाराज हे वेदांताचे गाढे अभ्यासक असून, त्यांनी वेदांच्या सखोल ज्ञानाचा अभ्यास करून त्याचे सार जनसामान्यांपर्यंत पोहोचवले आहे. या भेटीचा उद्देश आध्यात्मिक ज्ञानात अधिक वृद्धी करणे, तसेच वैयक्तिक आत्मशुद्धीच्या मार्गातल्या अडचणींवर चर्चा करणे हा होता.
चर्चेच्या काळात, त्यांनी विशेषतः आत्मा, परमात्मा, आणि त्यांच्या संबंधावर विचार मांडले.  आपल्या अध्यात्मिक साधनेतील अनुभव, आणि ती सिद्धीस नेण्यासाठी लागणारी साधना यावर  स्वामी गिरिधरजी महाराज यांनी अत्यंत प्रभावी उत्तरे देऊन समाधान केले. तसेच
 स्वामी गिरिधरजी महाराज यांनी नर्मदेश्वर सेवाधाम मध्ये आध्यात्मिक कार्यशाळा किंवा साधना शिबिर घेण्याची शिफारस केली, ज्यामुळे अधिकाधिक लोकांना वेदांत आणि आत्मिक ज्ञानाची अनुभूती मिळेल. असे गिरीधर जी महाराज यांनी म्हटल्याचे महंत आत्माराम गिरीजी महाराज यांनी सांगितले
 आपल्या भक्तांसाठी आणि समाजासाठी अध्यात्मिक जागरूकता वाढवण्याच्या उद्दिष्टाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत, यावरही चर्चा या दोन्ही संतांनी चर्चा केली.
या भेटीतून स्वामी गिरिधर जी महाराज यांच्याकडून मोठे आध्यात्मिक मार्गदर्शन मिळाले, ज्याचा पुढील साधनेत आणि समाजसेवेत मोठा फायदा होईल. असे नर्मदेश्वर सेवाधामचे महंत आत्मारामगिरीजी महाराज यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे