शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या सर्व सुविधा युक्त अशा अद्यावत व नुकत्याच राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालेल्या नवीन शैक्षणिक संकुलातील इमारतीत श्री साईबाबा संस्थानच्या ज्यु.के.जी. ते इयत्ता १० पर्यंतचे इंग्रजी व मराठी माध्यमांचे वर्ग सुरु करणेत आले.
श्री साई संस्थांनच्या साई आश्रम टू येथील भव्य अशा शैक्षणिक संकुल इमारती मध्ये हे वर्ग सुरू करण्यात आले आहेत.
यावेळी साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी येथे उपस्थित राहून नवीन शैक्षणिक संकुलातील वर्गांमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले. यावेळी इंग्लीश मिडीयम स्कूलचे माध्यमिक विभागाचे प्राचार्य तांबोळी सर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पुजारी मॅडम, कन्या विद्या मंदीर व कनिष्ठ महाविद्यालय चे प्राचार्य वरघुडे सर, वरिष्ठ महाविद्यालयचे प्रचार्य औताडे सर, वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ, बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता गणेश कोराटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments