लोणी (प्रतिनिधी) साबळे ज्ञानेश्वर : दहाव्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून आदरणीय डॉक्टर राजेंद्रजी विखे पाटील, अध्यक्ष, प्रवरा मेडिकल ट्रस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय लोणी यांच्यामार्फत आयुर्वेदाचा जनमानसात प्रचार व प्रसार करण्याच्या हेतूने लोणी येथे भव्य पदयात्रा व पथनाट्य यांचे आयोजन दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आले होते, पदयात्रेची सुरुवात महाविद्यालयापासून करण्यात आली व त्याची सांगता पथनाट्याच्या माध्यमातून लोणी बुद्रुक ग्रामपंचायत येथे झाली. या पदयात्रेमध्ये महाविद्यालयाचे सर्व अध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश आहेर यांनी सांगता समारंभावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले, तसेच डॉक्टर निवेदिता धनविजय यांनी कार्यक्रमाचे नियोजन व आभार प्रदर्शन केले
0 Comments