प्रसिद्ध सिने अभिनेते अनुपम खेर यांनी शिर्डीत घेतले साई दर्शन!शारीरिक व मानसिक स्वास्थ्य व संतुलनासाठी योगासन अत्यंत गरजेचे-अनुपम खेर

शिर्डी (प्रतिनिधी)- शिर्डीला साई दरबारी अनेक वर्षानंतर येण्याचा योग आला. येथे साई दर्शनानंतर शांत व समाधान मिळाले‌‌. अशी भावना प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केली.
प्रसिद्ध सिने अभिनेते आणि पद्मश्री पुरस्कार विजेते अनुपम खेर यांनी रविवारी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतले. 'साई दर्शनानंतर साई संस्थांनच्या वतीने जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे यांनी त्यांचा श्री साई मूर्ती व शाल देऊन सत्कार केला.
यावेळी अनुपम खेर म्हणाले की, आपणास अनेक वर्षांनंतर साईबाबांच्या दरबारात शिर्डीत येण्याचा योग आला.येथे साईदर्शनानंतर अत्यंत सुखद अनुभव आणि मन शांत झाले.आज साईबाबांनी मला इथं बोलवलं, याचा मला खूप आनंद आहे. शिर्डी येथील साईबाबा मंदिर व परिसरातील  प्रबंध अतिशय उत्तम असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.  दर तीन महिन्यांनी माझी आई, त्यांचे भाऊ आणि वहिनींसोबत शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येत असते", असे सांगत आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देत शारीरिक स्वास्थ्यासाठी व मानसिक संतुलनासाठी योगासन अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर योग दिनाला स्थान मिळवून दिल्याबद्दल त्यांचे यावेळी कौतुकही  केलं. अनुपम खेर संस्थान परिसरात आल्यानंतर साई भक्तांनी त्यांना ओळखताच त्यांना हात हलवत अभिवादन केलं.

Post a Comment

0 Comments