शिर्डी (राजकुमार गडकरी)- राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून व गावातील विविध शाळांतील गरजू विद्यार्थ्यांना वह्या व शालेय वस्तू वाटप करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर सावळीविहीर बुद्रुक येथील सरपंच ओमेश जपे, सरपंच महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब जनार्दन जपे, आदींच्या मार्गदर्शनाखाली येथे ग्रामपंचायत सोसायटी तसेच विविध संस्थांचे आजी, माजी पदाधिकारी, युवक कार्यकर्ते, ग्रामस्थ या सर्वांच्या वतीने येथे एकत्र येऊन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा जयजयकार करत एकमेकांना पेढे भरवत हा वाढदिवस साजरा केला. तत्पूर्वी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आवाहन केल्याप्रमाणे ग्रामस्थ व ग्रामपंचायत तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सावळीविहीर बुद्रुक गावातील सर्व अंगणवाड्या तसेच हायस्कूल, प्राथमिक शाळा, येथील विद्यार्थ्यांना आज शाळेचा पहिला दिवस असल्याने व नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केळी बिस्किटे, चॉकलेट वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, आदी शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच ओमेश जपे यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने शुभेच्छा दिल्या. व त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी यावेळी प्रार्थना केली. तर बाळासाहेब जपे यांनी ना. राधाकृष्ण विखे पा. यांनी आवाहन केल्याप्रमाणे फ्लेक्स, फलक न लावता किंवा सत्कार समारंभ न करता विद्यार्थ्यांना फळे तसेच शालेय उपयोगी वस्तू वाटप करण्यात आल्याचे सांगत देणगीदार भाऊसाहेब चौधरी ,संजय मातेरे,सोपान जपे, राजेंद्र साळवे, कोठारी परिवार, ज्ञानेश्वर जपे सर, सतीश जपे ,सुनील वाघमारे, राजेंद्र व सागर कुदळे, आदी देणगीदारांचे आभार मानले.व ना.विखे पाटलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सामाजिक कार्यकर्ते रमेश कसबे यांनीही यावेळी नामदार विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना आपला वाढदिवस विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटून साजरा करण्याचे केलेले आवाहन खरंच मोठे स्तुत्य असल्याचे व नामदार विखे पाटील हे गरिबांचा दाता असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी ना. राधाकृष्ण विखे पा. यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी मनोमन प्रार्थना करत एकमेकांना पेढे भरवत वाढदिवसानिमित्त आनंद उत्सव साजरा केला. व ना.विखे पाटलांचा विजय असो, त्यांना दीर्घ आयुष्य मिळो, एकच साहेब विखे साहेब अशा कार्यकर्त्यांनी घोषणाही यावेळी दिल्या.या कार्यक्रमाला उपसरपंच विकास जपे, कृ. उ. बा. समितीचे संचालक शांताराम जपे , गणेश कापसे, संतोष आगलावे, स्वप्निल पारडे, संजय जपे, आनंद जपे, सोपान पवार, राहुल आगलावे, राजू कापसे, राजेंद्र आसराज आगलावे, पत्रकार राजेंद्र गडकरी व राजेंद्र दुनबळे, निलेश आरणे, रामदास आगलावे, संजय वाघमारे, विक्रम आगलावे, कैलास पळसे ,सतीश वाघमारे, विनायक वाघमारे , राधु जाधव, सागर मनतोडे, आदींसह सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी ,कार्यकर्ते, ग्रामस्थ,यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments