जय भवानी विद्यामंदिर माध्यमिक विद्यालयाचा प्रवेशोत्सव व पुस्तक वाटप कार्यक्रम उत्साहात साजरा!

छत्रपती संभाजीनगर ( प्रतिनिधी)-छत्रपती संभाजीनगर येथील जय भवानी विद्यामंदिर माध्यमिक विद्यालयाचा प्रवेशोत्सव व पुस्तक वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात नुकताच संपन्न झाला.
छत्रपती संभाजी नगर येथील जय भवानी विद्यामंदिर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. व प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जय तुळजाभवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे चिटणीस मान. रंगनाथराव जाधव साहेब उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सदस्य मान. शिवाजीराव देवरे साहेब, प्रशालेचे मुख्याध्यापक डॉक्टर अरुण कांबळे, उपमुख्याध्यापिका श्रीमती मनीषा रांजणीकर, पर्यवेक्षिका श्रीमती सुनीता मोरे हे उपस्थित होते. 
    याप्रसंगी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवीन विद्यार्थ्यांचे रॅली काढण्यात आली. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. 
               कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रंगनाथराव जाधव साहेब व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री डॉक्टर अरुण कांबळे यांनी उपस्थित वविद्यार्थ्यांनाअभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री राजेंद्र देवरे यांनी केले.सदर कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments