सावळीविहीर बु.जि.प.शाळा व न्यू. इं. स्कूल हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा!विद्यार्थ्यांचे स्वागत करत व पेन, वह्या देत हुशार विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार!

शिर्डी (प्रतिनिधी)-राहाता तालुक्यातील सावळीविहीर बु. येथील सर्व अंगणवाड्या प्राथमिक शाळा व हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिल्या दिवशी मोठा सन्मान करत स्वागत करत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शालेय वस्तू तसेच बिस्किटे केळी वाटप करण्यात आली.
  सावळीविहीर बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी प्रभात फेरी काढली. त्यानंतर या चिमुकल्यांचे  पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत करण्यात आले. शाळेतील प्रांगणात सरपंच ओमेश साहेबराव जपे, सरपंच महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब जनार्दन जपे, उपसरपंच विकास जपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम जपे, ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक व विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या हस्ते या शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच बिस्कीटे, चॉकलेट वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच ओमेश जपे  तसेच बाळासाहेब जपे  यांनी पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून सर्व विद्यार्थी शिक्षक यांना शुभेच्छा दिल्या. तर मुख्याध्यापक मेहेत्रे सरांनी यावेळी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना बिस्किटे चॉकलेट व पेन ,वह्या वाटप केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. यावेळी संजय वाघमारे, सुभाष फाजगे, राजेंद्र साळवे, श्री व सौ ढगे, मुख्याध्यापक मेहेत्रे सर, गुरसळ सर, सैंदनशिव सर ,दिघे सर, ढापसे सर , श्रीमती रणमाळे मॅडम, आदी सह विद्यार्थी,पालक ,शिक्षणप्रेमी ,
नागरिक उपस्थित होते.
त्याचप्रमाणे येथील  रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्येही हा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देणगीदार भाऊसाहेब रामचंद्र चौधरी होते. यावेळी भाऊसाहेब चौधरी यांनी अकरा हजार रुपये,व स्टेज बांधून देणार असल्याने त्यांचा तसेच  संजय मातेरे यांनी कै. लक्ष्मणराव मातेरे यांच्या स्मरणार्थ पाच हजार रुपये तसेच पोहेगावचे मुख्याध्यापक सुनील वाघमारे यांनी आपले वडील  कै. कचरू वाघमारे (पोस्टमास्तर) यांच्या स्मरणार्थ पाच हजार रुपये, त्याचप्रमाणे सोपानराव जपे सर , अमोल कोठारी व परिवार, राजेंद्र साळवे ,ज्ञानेश्वर जपे,सतीष जपे ,राजेंद्र व सागर कुदळे, आदींनी शालेय वस्तूंसाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांचा तसेच शाळेच्या व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब जपे ,सदस्य किरण आगलावे, गणेश कापसे यांचा व त्याचप्रमाणे शाळेत दहावी मध्ये प्रथम आलेल्या वाघमारे नेहा राजू, द्वितीय तुरकणे भक्ती रमेश, तृतीय जमधडे अवंतिका नितीन, चतुर्थ आरणे उदयन दिनेश ,पंचम आरणे उदय सिताराम,कु. माधुरी योगेश शहाणे तर पाचवी मध्ये प्रथम आलेल्या जाधव सार्थक आनंद, तसेच प्रथम राजेंद्र आगलावे  ‌आदी हुशार विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल ,वह्या तसेच केळी, बिस्किटे वाटप करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब जपे यांनी सांगितले की, कर्मवीर अण्णांनी रोपटे लावलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या सुमारे देशात 1200 शाखा असून 20,000 अध्यापक आहेत. ही संस्था देशातील चार ते पाच राज्यात प्रसिद्ध असून  सर्वात मोठी संस्था आहे.या संस्थेमध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. या शाळेसाठी देणगीदार भाऊसाहेब चौधरी यांनी येथे दुसऱ्यांदा भेट दिली असून ते स्टेज बांधून देणार असल्याचे सांगत येथे प्रवेश घेणाऱ्या पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश दिला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सर्व देणगीदारांचे आभार मानत  या शाळेसाठी असेच देणगीदाराने सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी राजू वाघमारे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.प्रथम मुख्याध्यापक बनसोडे सर यांनी सर्वांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला गणपत गोंदकर, किरण आगलावे, गणेश कापसे,नवनाथ जपे, पोलीस पाटील सौ संगीता सुरेश वाघमारे, पद्माबाई कापसे, विठ्ठलराव मातेरे, शिवाजी आगलावे, संदीप विघे, किरण जपे,दिनेश आरणे, सुनील आगलावे, राजू कापसे,राजू आगलावे ,राहूल आगलावे, जाकीर शेख, संजय वाघमारे, मारुती कापसे, सतीश वाघमारे, या न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील मुख्याध्यापक सर्वश्री बनसोडे सर ,सौ.डहाळे मॅडम श्री.म्हस्के सर ,श्री.काळेगोरे सर श्री.खान सर ,श्री.खेडकर सर
श्रीमती.कानडे मॅडम श्री.धीवर सर,श्री.वाकचौरे सर आदी शिक्षक, पालक, विद्यार्थी, शिक्षण प्रेमी नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे गावातील इतर अंगणवाड्या, प्राथमिक शाळा, यांनाही ग्रामपंचायत तिचे वतीने सरपंच ओमेश जपे, बाळासाहेब जपे, उपसरपंच विकास जपे, शांताराम जपे, आनंद जपे, आदींच्या उपस्थितीत पेन वह्या आदीचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील वाढदिवसाच्या औचित्य साधून शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. आज सोमवार शाळेतील पहिला दिवस असल्याने व विद्यार्थ्यांचे  जोरदार स्वागत झाल्याने विद्यार्थीही मोठे खुश दिसत  होते. अनेक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी या उपक्रमाचे मोठे स्वागत केले.

Post a Comment

0 Comments