राहुरी / प्रतिनीधी : तू गाडीत बस आणि माझ्या बरोबर चल, अन्यथा तूझ्या दाजीला जीवे ठार मारील. अशी धमकी देऊन राहुरी शहरातून एका काॅलेज तरुणीचे अपहरण केल्याची घटना दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी घडलीय. या बाबत एका तरुणावर विनयभंग सह अपहरणचा गून्हा दाखल करण्यात आलाय.
या घटनेतील १६ वर्षे २ महिने वय असलेली अल्पवयीन तरुणी पर गावात राहते. शिक्षणा निमित्त गेल्या दोन वर्षांपासून ती तरुणी राहुरी तालूक्यातील गोटूंबे आखाडा परिसरात तीची बहिण व दाजी यांच्याकडे राहते. ती राहुरी शहरातील एका काॅलेजमध्ये ११ वीच्या वर्गात शिक्षण घेत असुन येताना जाताना आरोपी तीचा नेहमी पाठलाग करायचा. दि. १७ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजे दरम्यान ती तरुणी काॅलेजमध्ये येत असताना आरोपीने त्याच्या एम एच १७ ए जे ५७०७ या इरटिगा गाडीतून पाठलाग केला. आणि गाडी तीच्या काॅलेज समोर उभा केली. तरुणी गाडी जवळ आल्या नंतर आरोपी तीला म्हणाला कि, तू गाडीत बस आणि माझ्या बरोबर चल. नाहीतर तूझ्या दाजीला जीवे ठार मारील. अशी धमकी देवुन आरोपी राजन सुसे याने तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवून गाडी राहुरी कॉलेजच्या दिशेने नेली. तरुणीला फूस लावून आपल्याला पळून जायचे आहे, असे सांगितले. परंतु तरुणीने त्याला नकार दिला. त्यावेळी तरुणाला कोणाचा तरी फोन आल्याने त्याने गाडी राहुरी कॉलेज परिसरातून मागे फिरविली व त्या तरुणीला राहुरी बस स्थानक जवळील रिक्षा स्टँड वर सोडले. घटनेनंतर तरुणीने तीच्या नातेवाईकांसह राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगीतला.
त्या तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपी राजन चंद्रकांत सूसे याच्यावर गून्हा रजि. नं. ११८४ भादंवि कलम ३५४ ड, ३६३, ५०६ प्रमाणे विनयभंग व अपहरणचा गून्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भाऊसाहेब शेळके हे करीत आहेत.
0 Comments