शिर्डी( प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे भारताच्या स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील ग्रामपंचायत समोर सरपंच सौ रुपालीताई संतोष आगलावे यांनी झेंडावंदन केले .यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूलचे विद्यार्थी शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे येथील सावळीविहीर बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूल मध्ये शाळेचे माजी विद्यार्थी व युवक कार्यकर्ते किरण राजेंद्र आगलावे यांनी झेंडावंदन केले. तत्पूर्वी या शाळेतील विद्यार्थ्यांनी त्याचप्रमाणे सोमय्या विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी गावातून भारत माता की जय ,वंदे मातरम म्हणत प्रभात फेरी काढली. त्यानंतर झेंडावंदन करण्यात आले तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावळीविहीर बुद्रुक येथे मा. उपसरपंच सौ. वृषाली ओमेश जपे यांनी झेंडावंदन केल्यानंतर विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
0 Comments