स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त निमगाव म्हाळुंगी येथील आश्रम शाळेत विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न!

 निमगाव म्हाळुंगी (अनिल गुंजाळ) भारताचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव सर्वत्र साजरा होत असून शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथेही हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला .निमगाव म्हाळुंगी तालुका शिरूर येथील श्रीमती बबईताई टाकळकर माध्यमिक आश्रम शाळेत या भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले .

या आश्रम शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरी काढून स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत घरावर, दुकानावर तिरंगा फडकवण्यासाठी जनजागृती केली.

या आश्रम शाळेत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान स्वतंत्र महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रथम शालेय परिसरात 101 विविध प्रकारच्या चिरकाल टिकणाऱ्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. वृक्षसेवा संवर्धन समितीचे अजित रणसिंग यांच्या सहकार्याने ही झाडे लावण्यात आली. त्याचप्रमाणे हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत गावात प्रत्येकाने घरावर तिरंगा लावण्यासाठी गावात जनजागृती साठी प्रभात फेरी काढण्यात आली .प्रभात फेरीत देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या तसेच सर्प दंश मुक्त शिरूर अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम, वनस्पती क्षेत्र शिरूर चे वन रक्षक प्रमोद पाटील व सर्व सर्पमित्र आणि वन रक्षक रेस्क्यू टीम सदस्य श्री गणेश टिळेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच रक्षाबंधनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शाळेतील विद्यार्थिनींनी राखी बांधून बंधुभाव जपला , गावातील माजी सैनिकांनाही विद्यार्थिनींनी राखी बांधून देशप्रेम जपले, तसेच वृक्षांनाही राखी बांधून वृक्ष संवर्धनाचे पर्यावरणाचे महत्त्व त्यातून पटवून दिले.



 यावेळी ज्येष्ठ संचालक लांडगे यांनी मार्गदर्शन केले. शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक माहिती देऊन स्वच्छता आरोग्य विषयी दक्षता घेण्यासंदर्भात विविध मार्गदर्शन केले. यावेळी डॉक्टर विराज भंडलकर, डॉक्टर राजेश चांदणे, सुजाता चव्हाण आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सव निमित्त आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. अशी माहिती या आश्रम शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापका सौ.कर्पे सुनीता रावसाहेब यांनी दिली. सुवर्ण महोत्सवानिमित्त या आश्रम शाळेत विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी पालकांनीही त्यास मोठा प्रतिसाद दिला. या सर्व कार्यक्रमासाठी प्रभारी मुख्याध्यापका सौ करपे मॅडम त्याचप्रमाणे सौ कानकुटे मॅडम, श्री लोहे सर ,श्री जमादार सर, श्री खेडकर, श्री मुळे, श्री गुंजाळ सर, श्री भागवत, श्री राठोड ,श्री वाघमारे सर ,श्री कोळी आदी शिक्षक व इतर कर्मचारी यांनी मोठे परिश्रम घेतले.

हे सर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाल्याबद्दल या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी या शाळेचे सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!