शिर्डी येथील साई संस्थांनच्या अध्यक्षपदी जि. प.मा.अध्यक्षा शालिनीताई विखे पा. यांची निवड करावी-मागणी

शिर्डी ( प्रतिनिधी) 
आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात यावी. अशी मागणी भारतीय लहुजी सेनेचे कार्याध्यक्ष समीर वीर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
शिर्डी येथील श्री साईबाबा देवस्थान हे श्रीमंत व देशांमध्ये तिरुपती नंतरचे मोठे प्रसिद्ध असे आंतरराष्ट्रीय तीर्थस्थान समजले जाते. अशा या देवस्थानचा कारभार पाहण्यासाठी श्री साईबाबा संस्थान येथे कार्यरत आहे. अशा या साई संस्थांनच्या अध्यक्षपदी राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड होणे जनतेला अपेक्षित होते. मात्र त्यांना महसूल मंत्री पद मिळाल्याने व भाजपा पक्षांमध्ये एक व्यक्ती एक पद असा संकेत असल्यामुळे नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर खासदार सुजय विखे पाटील यांना पदे असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांना साई संस्थांनच्या अध्यक्षपदी निवड करावी. अशी मागणी भारतीय लहुजी सेनेचे कार्याध्यक्ष समीर वीर यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच केली आहे. या पत्रात त्यांनी पुढे म्हटले आहे की, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील या निस्सिम साईभक्त आहेत. श्री साईबाबांवर त्यांची मोठी श्रद्धाआहे. त्यांना तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या प्रशासनाचा व विविध क्षेत्रातील कामाचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे सौ शालिनीताई विखे पा. यांना शिर्डी येथील श्री साई संस्थांनच्या अध्यक्षपदी विद्यमान सरकारने निवड करावी .अशी त्यांनी मागणी केली असून जर सौ. शालिनीताई विखे पा. यांना अध्यक्ष पदी निवड केली नाही तर या संदर्भात आपण थेट मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात या संदर्भात याचिका दाखल करू, अशी मागणी समीर वीर यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे