साईनगरी शिर्डीतील गावठी कट्ट्याचे मध्यप्रदेशातील कनेक्शन तीन वर्षात दहा गावठी कट्टे शिर्डी परिसरात हस्तगत पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील

शिर्डी (प्रतिनिधी) शहरात गेल्या तीन वर्षात शिर्डी पोलिसांनी केलेल्या विविध कारवाईत जवळपास दहा कट्टे हस्तगत करण्यात यश मिळाले असले तरी या गुन्ह्यात सापडलेल्या सर्व तरुणांचे वय २२ ते ३२ या दरम्यानचे असून कमी असणारे शिक्षण, असलेली गरिबी , किरकोळ कारणावरून होणारे वाद ,डोक्यात असलेली भाईगिरी ची हवा, कुटुंबाचे असलेले दुर्लक्ष, अवैध धंदे, त्यातून मिळणारा दोन नंबर पैसा, यामुळे परराज्यातून सहजपणे ७ हजारात कट्टा आणत व त्याचा दहशतीसाठी वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे .गेल्या एका वर्षात शिर्डी पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत चार कट्टे हस्तगत केले असून एका गुन्ह्यात अनावधानाने केलेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झालेला होता ‌.अशी माहिती पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दिली
         शिर्डी शहरात वर्षभरात कोबिंग ऑपरेशन करण्यात आले असून एक कट्टा पोहेगाव येथे तर दुसरा कट्टा शिर्डी शहरातील गुटखा व्यवसाय करत असलेल्या तरुणाकडे तर सावळी विहीर येथील दोन तरुणांकडे दोन गावठी कट्टे हस्तगत करण्यात आली आहे. एका वर्षात चार कट्टे जरी हस्तगत केलेले असले तरी आणखी कोणी तरुण गावठी कट्टे वापरत आहे का? किंवा विक्रीसाठी गावठी कट्टे आणत आहे का?याकडे देखील जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वाती भोर, शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे बारीक लक्ष असून आलेले हे कट्टे मध्य प्रदेशातील उंबरठी या नावाचे गाव असून त्या ठिकाणावर याची खरेदी केली जाते. गावठी कट्टा जवळ बाळगणे हा दखलपात्र गुन्हा असून यासाठी जवळपास तीन वर्षाची शिक्षेची देखील तरतूद आहे. मात्र कमी असणारे वय गुंडगिरी व भाईगिरी ची हवा कमी असणारे शिक्षण कुटुंबाचे दुर्लक्ष यामुळे तरुण अशा गुन्हेगारीकडे वळत आहेत. जरी एखाद्या घरातील तरुणाकडे किंवा इतर कोणाकडे गावठी कट्टाअसला तरी माहिती देण्यासाठी होणारे घरातील लोकांचे दुर्लक्ष त्यामुळे असे प्रकार वाढत आहेत तसेच व्यसनधीनता यामुळे काही तरुणांना गावठी कट्टाचा मोह होतो व त्यातून कधीकधी अनुचित घटना देखील घडते. सावळीविहिर येथील घटनेतील पकडण्यात आलेल्या दोघांचे वय देखील २२ ते २५ वर्षे असून त्यांच्यावर ह्या अगोदर कुठले स्वरूपाचा गुन्हा देखील दाखल नाही. मात्र किरकोळ वादातून आपल्याला धोका होऊ शकतो हि मनातील भिंती या अनुषंगाने ह्या दोघांनीही कट्टे खरेदी केले असल्याचे देखील तपासात पुढे आले असून खरेदी करण्यासाठी ज्या स्थानिक इसमाने मध्य प्रदेशातील उबरठी या गावाचा मोबाईल नंबर दिला होता. मात्र तोच चार महिन्यांपूर्वी मयत झाल्याने काही तांत्रिक अडचणी देखील उभे राहिलेले आहेत. तरीही पोलिसांचे तपासासाठी मोठे प्रयत्न सुरू असून अशा गुन्ह्यातील संशयित आरोपीचे समुपदेशन करून भविष्यात पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा त्यांच्याकडून होणार नाही यासाठी देखील आमचा प्रयत्न सुरू असून जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्या अनुषंगाने प्रयत्न देखील सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी सांगितले. दरम्यान कोणाकडे गावठी कट्टा असल्यास व त्याची माहिती मिळाल्यास शिर्डी पोलिसांशी संपर्क करावा त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहनही शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे