अहमदनगरच्या न्यायालयीन आणि औद्यौगिक आरक्षणाबात उद्योगमंत्र्यांची बैठक सकारात्मक

मुंबई (छत्रपती एक्सप्रेस वृत्तसेवा) अहमदनगर शहरातील न्यायालयीन प्रक्रियेबाबत आणि पिंपळगाव माळवी या गावातील महाराष्ट्र औद्योगीक प्राधिकरणाचे आरक्षण उठवण्यासंबधी नुकतीच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उत्साहात बैठक पार पडली. 
अहमदनगर शहरातील न्यायालयीन प्रक्रियेबाबत अनेक सोयी सुविधा बाबतची यावेळी गांभिर्याने दखल घेण्यात आली तसेच नवनागापूर गावातील एम. आय.डी.सी.च्या लगत असलेल्या जमिनीवर पेव्हिंग ब्लॉक बसवुन सुशोभीकरणाचा महत्वपुर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला तसेच अंतर्गत रस्त्यांचे विकास धोरण देखील ठरविण्यात आले अहमदनगर शहरात व जिल्हाभरात उद्योगांचे विविध मार्ग उपलब्ध करून देण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला अहमदनगर जिल्ह्याच्या महत्वपूर्ण प्रश्नांवर बैठक घेतल्याबद्दल उद्योगमंत्री उदय सामंत यांचे यावेळी आभार मानण्यात आले.
प्रसंगी बैठकीस महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी श्री. अन्बलगन , खासदार डॉ. सुजय विखे पाटील ,शिवाजीराव कर्डिले ,उपप्रादेशिक अधिकारी व सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!