प्रवरानगर येथील पद्मश्री डॉक्टर विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा 73 व गळीत हंगाम शुभारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे पा.बोलत होते. यावेळी मा.चेअरमन डॉक्टर भास्करराव खर्डे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या मा.अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंद सदाफळ, व्हाईस चेअरमन विश्वास कडू ,प्रवरा बँकेचे चेअरमन अशोक म्हसे, ट्रक सोसायटीचे चेअरमन नंदू राठी ,चेअरमन गीता थेटे, भाजपाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर , सल्लागार जिमी, कार्यकारी संचालक अभिजीत भागडे,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना डॉक्टर खासदार सुजय विखे म्हणाले की,
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारमध्ये सहकार मंत्रालय स्थापन करून सहकारी साखर कारखानदारीच्या बाबतीत मोठे निर्णय घेतले आहेत . केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून राज्यातील सहकार चळवळ सक्षम होत असल्याचे सांगत त्यांनी यंदा प्रथमच कारखान्याचे व्यवस्थापन कामगार आणि यंत्रणा सज्ज आहे .परंतु मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने ऊस तोडणी कशी सुरू करायचे आहे याचे आव्हान असल्याचे सांगत जेवढा कालावधी मिळेल त्यामध्ये गाळप पूर्ण होईल. असा विश्वास डॉक्टर खा.सुजय विखे यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हा. चेअरमन विश्वासराव कडू पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी ,कामगार, ऊस उत्पादक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments