गोगलगांव प्रतिनीधी श्री.सुरेश ठोके
दि.२४ आॅक्टोंबर २०२२
राहता तहसिल अन्नधान्य पुरवठा विभागाला वेळोवेळी संपर्क करूनही गोगलगावच्या स्वस्त धान्य दुकानातुन आजपर्यंत रेशन पुरवठा व रेशन किट कार्डधारकापर्यंत मिळाले नाही.
ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसात गतवर्षीच्या अतिवृष्टीने मेटाकीटीला आलेल्या व बसक्या बैलासारखी परीस्थीती झालेल्या शेतकरी,कष्टकरी,मजूर यांची मजबुरीने जखडलेल्या शेतकर्यानां वाली राहीले नसून गावाशेजारील रेशन वाटप सुरळीत चालु पण गोगलगांवचे रेशन दुकान बंद असुन गावकर्यांची परीस्थीती म्हणजे दुकानाला चकरा मारून मारून चक्कर येण्याची वेळ आली.
राहाता तहसिलच्या पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे ऐन दिवाळीत ४ दिवसात वाटप होणारे रेशन १ दिवसात कसे वाटणार.
मराठीतील म्हणीप्रमाणे- "नक्टीच्या लग्नाला १७ विघ्ने "असे आॅनलाइन सर्व्हर डाऊन,रेशन धान्य किटमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या वस्तुमध्ये तेल तरी कमी देणार या ना त्या कारणाने आता रेशन आले तरी ते सर्वांना मिळेलच याची सुदराम खात्री नाही.
आता शेतकरी,कष्टकर्यांची गोड दिवाळी कडू होणार असेच वाटू लागले आहे.१००% टक्के रेशनवरच अवलंबुन असणार्या लोकांना मुळात अतिवृष्टीने झोडपले त्यात आता पुरवठा विभागाने मुस्काडात मारल्यागत झाल्याने गतवर्षाची दिवाळीने गोगलगावचे दिवाळे काढले हे बोलणे वावगे होणार नाही.
आता तरी सुस्त यंत्रणा जागी होवून गोगलगांवकरानां दिवाळीचे रेशन व मा.मत्रीमहोदयांची रेशन धान्य किट सणाला देतील का? हे आजच समजेल.
0 Comments