कर्मवीर( आण्णा)भाऊराव पाटलांनी स्थापन केलेल्या व आशिया खंडात नावलौकिक असलेल्या सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेच्या राहता तालुक्यातील लोणी येथील विद्यालयाची नेहमी प्रत्येक शैक्षणिक क्षेत्रात मोठी भरारी सुरू असते. अनेक पारितोषिके या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आतापर्यंत मिळवलेले आहेत.
अशाच एका स्पर्धेत येथील विद्यार्थिनीने मोठे यश संपादन केले आहे.
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम वाचन प्रेरणा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत राहाता तालुक्यातील लोणी येथील रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी अपेक्षा संजय सोनवणे हिच्या संकल्पनेतून साकारलेल्या पेंटिंगला तृतीय क्रमांक मिळाला आहे. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या विशेष पेंटिंगची दखल घेऊन तिला पारितोषक देऊन तिचा स्वतः सन्मान केला आहे. राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या विद्यार्थिनीचे अभिनंदन केले आहे .तसेच रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य एकनाथराव घोगरे पाटील, सर्व स्कूल कमिटीचे सदस्य तसेच रयत शिक्षण संकुलचे प्राचार्य गमे जी.टी व रयत परिवाराच्या वतीने या विद्यार्थिनीचे अभिनंदन होत आहे. रयत शिक्षण संस्था ही राज्यातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडामध्ये सर्वात मोठी व नावलौकिक असणारी एक संस्था आहे. अशा या संस्थेमध्ये लोणी येथील विद्यालय नेहमी नावलौकिक मिळवण्यात नेहमी पुढे असते. या विद्यालयाचे प्राचार्य कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय असल्यामुळे या शाळेमध्ये शैक्षणिक गुणवत्ता व इतर विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही मोठी वाव दिली जाते .त्यातूनच अनेक विद्यार्थी यश मिळवत आहेत. त्यामुळे कुमारी अपेक्षा संजय सोनवणे हिने या स्पर्धेत मोठे यश मिळवले आहे. या विद्यार्थिनीचे व तिला मार्गदर्शन करणारे या विद्यालयाचे प्राचार्य तसेच सर्व शिक्षक वृंद यांचेही लोणी, प्रवरानगर परिसरातून अभिनंदन होत आहे.
0 Comments