ॲड.सौ. ज्योती सोमनाथ सातपुते ह्या लोहगाव पंचक्रोशीतील प्रथम महिला वकील

 

राहाता(छत्रपती‌ एक्सप्रेस) तालुक्यातील लोहगाव पंचक्रोशीतील प्रथम महिला वकील.सौ.ज्योती सोमनाथ सातपुते यांचा पदवीदान समारंभ नुकताच संगमनेर येथे पार पडला यावेळी अनेक नुतन वकिलांना देखील पदवी प्राप्त झाली.
सौ.सातपुते ह्या संगमनेर येथील ओंमकारनाथ मालपाणी लॉ कॉलेज येथे कायद्याच्या परिक्षेत प्रथम श्रेणीत उतीर्ण झाल्या असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे त्या पंचक्रोशीतील प्रथम महिला वकील ठरल्या आहेत आपल्या वकीलीत आपण समाजातील शोषित वंचित दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवुन देण्यासाठी कार्यरत असणार असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले तसेच पती सोमनाथ सातपुते यांनी सौ.सातपुते यांच्या पदवीसाठी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे