तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे येथून हेलिकॉप्टरने शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या हेलिपॅडवर आज बुधवारी दुपारी आगमन झाले. यावेळी महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . यावेळी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर त्यांच्या समवेत उपस्थित होते. नामदार एकनाथराव शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी प्रथमच शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. शिर्डीत आल्यानंतर नामदार एकनाथराव शिंदे यांना अभिवादन करण्यासाठी साई भक्त व ग्रामस्थांनी ही मोठी गर्दी केली होती. या मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान शिर्डीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. साई दर्शनानंतर मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांचा साई संस्थांनच्या वतीने सत्कार केला. मुख्यमंत्र्यांच्या शिर्डी भेटी प्रसंगी बाळासाहेबांची शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते,राजेंद्र देवकर, बाळासाहेब पवार, शिवाजी चौधरी, रमेश काळे, विजय काळे ,राजेंद्र शेळके, सुनील बाराहाते, वीरेश गोंदकर, सचिन जाधव , मच्छिंद्र गायके, बाबुशेठ टायरवाले,जयराम कांदळकर आदी कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते.
0 Comments