लोणी पोलिसांनी मोटरसायकल चोरणारी टोळी केली जेरबंद! तीन गुन्हे उघड! आठ लाखाच्या सहा चोरीच्या दुचाकीसह इतर मुद्देमाल जप्त!

लोणी( प्रतिनिधी) राहता तालुक्यातील लोणी पोलिसांनी एका मोटरसायकल चोराला गजाआड केल्यानंतर तीन गुन्हे उघड झाले आहेत, आठ लाखाच्या सहा चोरीच्या दुचाकीसह इतर मुद्देमाल जप्त करण्यात आल्या आहेत.
यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, राहाता तालुक्यातील लोणी पोलीस स्टेशन मध्ये एका फिर्यादीने आपल्या मालकीची पस्तीस हजार रुपये किमतीची बजाज पल्सर कंपनीची काळ्या रंगाची एमएच ४७ एएम 96 44 ही कोणीतरी अज्ञान चोरट्याने चोरून नेल्याबाबत फिर्याद 26 मार्च 21 रोजी दाखल करण्यात आली होती. लोणी पोलीस स्टेशनला त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता व या मोटरसायकल चोरी संदर्भात लोणी पोलीस स्टेशनचे स. पोलीस निरीक्षक समाधान पाटील हे तपास करीत असतानाच त्यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम विना कागदपत्रे एक बजाज पल्सर कंपनीची मोटर सायकल वापरत आहे. अशी गुप्त बातमी मिळाल्याने स.पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर योगेश शिंदे, पोलीस सब इन्स्पेक्टर श्री विठ्ठल घोडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संपत जायभाये ,पोलीस नाईक शरद पवार, पोलीस नाईक निलेश मेटकर, पोलीस नाईक मनोज सणासने, अशांनी या मोटरसायकल वापरणाऱ्या संशयित इसमाचा शोध घेतला. त्याच्याकडे बजाज पल्सर गाडीसह तो लोणी खुर्द गावात मिळून आल्याने त्याच्याकडे मोटरसायकलचे मालकी हक्काबाबत विचारपूस करता त्याने उडवडीची व असमाधानकारक उत्तरे दिल्याने त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे अधिक विचारपूस करताच त्याने त्याचे नाव दिप भटू सातपुते वय 21 राहणार लोणी बुद्रुक सोनगाव रोड तालुका राहता जिल्हा अहमदनगर मुळगाव कतार ग्राम ,ललिता सोसायटी ,सुरत, गुजरात असे सांगितले व सदरची मोटरसायकल व लोणी गावातील व वेगवेगळ्या ठिकाणाहून व पुणे येथून त्याचे इतर साथीदाराच्या मदतीने त्याने इतर मोटरसायकल चोरी केल्याबाबत कबुली दिलेली असून त्याच्याकडून व त्याच्या साथीदाराकडून तीन गुन्हे उघड झाले आहेत .आठ लाखाच्या सहा दुचाकी व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शरद पवार हे करीत आहेत. या गुन्ह्यात त्याचे इतर साथीदार शुभम संजय तेजीमकर वय 22 राहणार लोणी बुद्रुक व सुदर्शन संपत विखे राहणार लोणी बुद्रुक सोनगाव रोड यांनाही ताब्यात घेऊन अधिक विचारपूस करताच त्यांच्याकडे या सहा मोटरसायकल मिळून आले आहेत. अधिक तपास लोणी पोलीस स्टेशनचे सपोनी समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!