श्रद्धा खून प्रकरणाचा निषेध करत लव जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा त्वरित पारित करावा या संदर्भात लोणी पोलीस स्टेशनला सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आले निवेदन!

लोणी (प्रतिनिधी) सध्या देशामध्ये व राज्यांमध्ये लव जिहाद व धर्मांतर करून विवाह करण्याचे मोठे कारस्थान सुरू असून त्यातूनच श्रद्धा यावलकर खून प्रकरण घडल्याची चर्चा आहे. त्यामुळेच लव जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा पारित करण्यासाठी प्रवरा परिसराच्या वतीने सकल हिंदू समाज यांनी लोणी पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन श्रद्धा खून प्रकरणांचा निषेध नोंदवला आहे.
आज शुक्रवारी सर्व हिंदू समाजाच्या वतीने सकल हिंदू समाज त्यांच्या वतीने राहता तालुक्यातील लोणी पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे.
व श्रद्धा खून घटनेचा निषेध यावेळी केला आहे. या निवेदनात श्रद्धा खून प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, कै. श्रद्धाला न्याय मिळावा, तसेच लव जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा पारित करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने पुढाकार घेऊन तो पारित करावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनानंतर पोलीस अधिकारी यांनी आपल्या मागण्या व निवेदन शासनाकडे त्वरित पाठवण्यात येतील. असे आश्वासन यावेळी दिले. यावेळी सकल हिंदू समाजातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी जय श्रीराम जय श्रीराम च्या गोष्टी देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे