या संदर्भात बोलताना खा.डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, जानेवारी २०२१ मध्ये या मार्गाकरीता पाठपुरावा करुन, ४३० कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला होता. या निधीतून या कामाची सुरुवातही झाली होती.परंतू गुणवत्तापुर्ण काम न झाल्याने १३ जुलै २०२२ रोजी या ठेकेदाराचे काम रद्द करण्यात आले होते. त्यानंतर कोव्हीड संकट, अतिवृष्टी या कारणामुळे त्यामुळे या मार्गाच्या कामाला विलंब झाला ही वस्तुस्थिती असली तरी,
या मार्गावरील असलेले खड्डे बुजविण्यासाठी ८ ऑगस्ट २०२२ रोजी पहिल्या टप्प्यात ८.६२ कोटी रुपये आणि दुस-या टप्प्यात ६ कोटी अशा एकुण १४.६२ कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन आणण्यात आपल्याला यश आले आहे.या निधीतूनच या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम ७५ टक्के पुर्ण झाले असून, उर्वरित काम १५ डिसेंबर २०२२ पर्यंत पुर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगर मनमाड महामार्गाचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोतोपरी सहकार्याची भूमिका घेतली असून,केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे सदर रस्त्याच्या कामाकरीता आता ४ नोव्हेंबर २०२२ रोजी पुन्हा नव्याने ७९८ कोटी रुपयांच्या निवीदा प्रक्रीयेस मान्यता मिळाली आहे.जुन्या निविदेपेक्षाही ८५ टक्कें जास्त निधीची ही निवीदा प्रक्रीया आता प्रशासकीय स्तरावर सुरु करण्यात आली असून, डिसेंबर २०२२ नंतर या रस्त्याची निवीदा प्रक्रीया पुर्ण होणार असल्याने कुठल्याही परिस्थितीत २०२३ च्या पहिल्या आठवड्यात नवीन ठेकेदार नियुक्त होवून या रस्त्याचे काम सुरु होणार असल्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली तसेच केंद्रीय रस्तेविकास मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या सहकार्याने नगर मनमाड रस्त्याच्या कामास भरघोस निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी त्यांचे आभारही मानले आहेत.
0 Comments