चक्क काकाच्या कुत्र्यावर कोयत्याने वार पुतण्यावर लोणी पोलीस स्टेशनला झाली एफ आय आर दाखल

लोणी( प्रतिनिधी )
राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे वस्तीवर बांधलेल्या कुत्र्याला कोयत्याने व दगडाने मारहाण करून जखमी केल्यामुळे व या कुत्र्याच्या मालकालाही कोयत्याने मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात एका जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदर्भात अधिक माहिती अशी की, लोणी खुर्द येथील मापारवाडी येथे राहणारे बाबासाहेब लक्ष्मण ढोबळे यांनी लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, आपण मापरवाडी लोणी खुर्द येथील वस्ती वर नवरा बायको राहतो . आमची दोन्ही मुले नोकरीनिमित्त बाहेर आहेत.त्यामुळे येथे आम्ही एक गावरान कुत्रा पाळला आहे. 3 डिसेंबर २२ रोजी आम्ही टाकळीभान तालुका श्रीरामपूर येथे नातेवाईकाच्या वर्ष श्राद्धे साठी गेलो होतो .घरी कोणी नसल्याने घरचा पाळलेला गावरान कुत्रा आम्ही कोणाला चावू नये म्हणून साखळीने बांधून ठेवला होता. आम्ही टाकळीभान येथे असताना माझा पुतण्या दीपक दत्तात्रय ढोबळे यांनी फोन करून तुझ्या कुत्र्याचे कामच केले आहे. त्याला मी कोयत्याने तोडले आहे. असे फोनवर सांगितले. त्यावर मी तू तिकडे कशाला गेला होता. तुझे तिकडे जाण्याचे काय काम ,असे बोलण्याचा राग घेऊन त्याने मला सुद्धा तू घरी ये कोयता घासून ठेवला आहे. तुझे काम करतो. अशी मला फोनवरून धमकी दिली .त्यानंतर मी जलद गतीने घरी आलो असता माझ्या गावरान कुत्रा हा त्याच्या बांधलेल्या ठिकाणी जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्याच्या तोंडावर पाठीवर कोयत्याने वार केले असून त्याचा उजवा पाय मोडलेला आहे. त्यामुळे माझ्या गावरान कुत्र्याला कोयत्याने व दगडाने जखमी करणारा तसेच मलाही कोयत्याने मारण्याची धमकी देणारा माझा पुतण्या दीपक दत्तात्रय ढोबळे यांच्याविरुद्ध लोणी पोलीस स्टेशनला त्यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीनुसार लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 609/ 22 प्रमाणे भादवि कलम 428 /429 /507 तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास लोणीचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे