लोहगाव ग्रामपंचायत साठी उमेदवारांनी शेवटच्या दिवशी भरले अर्ज! तालुका तहसील कार्यालयात उमेदवारांची व समर्थकांची मोठी गर्दी!

राहाता तालुक्यातील लोहगाव येथील ग्रामपंचायतच्या १३ जागेसाठी आज नामा निर्देशन फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी राहता तहसील कार्यालय मध्ये मोठी गर्दी होती.
राहता तालुक्यातील बारा ग्रामपंचायतची निवडणूक असल्यामुळे प्रत्येक बारा ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी व अर्ज घेण्यासाठी स्वतंत्र टेबल मांडण्यात आले होते. १३ जागेसाठी ही निवडणूक होत असून अनेक इच्छुक उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले आहेत त्याचप्रमाणे सरपंच पदासाठी ही थेट निवडणूक होत असून या निवडणुकीसाठी ही अर्ज दाखल होत आहेत. त्यामध्ये महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे गटाचे दोन पॅनल व काही अपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी नक्की उमेदवार कोण राहणार कोण निवडणूक लढवणार हे कळणार आहे मात्र आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचें शेवटच्या दिवशी राहता तहसील कार्यालय येथे उमेदवारांची व त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी दिसून येत होती.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे