गोगलगाव येथे जागतिक मृदा दिन साजरा...


गोगलगांव प्रतिनीधी-श्री.सुरेश ठोके

प्रवरा इन्टीट्युट आॅफ रिसर्च अॅण्ड एज्युकेशन इन नॅचरल सायन्सेस (पायरेन्स) संचलीत व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गोगलगांव,ता-राहाता येथे प्रगतशिल शेतकरी श्री.मारूती कृष्णा ठोके यांच्या शेतावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राहत्याचे तालुका कृषी अधिकारी श्री.बापुसाहेब शिंदे साहेब होते.त्यांनी त्यांच्या शेतीविषयी कथनात "नैसर्गीक" शेती करतानां मृदु संवर्धन करतानां माती परीक्षण करून आवश्यकतेनुसार सेंद्रीय व रासायनीक खतांच्या मात्रा देवून पिक उत्पन्न वाढवणे,मल्चींग पेपर, सुक्ष्म व तुषार सिंचनाच्या माध्यमातुन कमी पाण्याचा वापर करून पिके घेणे,शासकीय योजनेचा लाभ त्याचप्रमाणे शेतीपूरक व्यावसायातुन पशुपालन व चारा व्यवस्थापण करून शेतकर्‍यांचे जिवनमान उंचावणे यावर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात कृषि विज्ञान केंद्र,बाभळेश्वरचे पशुविज्ञान अधिकारी डाॅ.विठ्ठलराव विखे यांनी पशुपालकांना लंपी आजारापासून संरक्षणाविषयी मार्गदर्शन केले.मृदु शास्रज्ञ शांताराम सोनवणे साहेबांनी गांडूळ खत निर्मीती करून शेतीच्या सुपिकता व पिकांच्या आवश्यकतेनुसार खते यावर मंथन केले.शास्रज्ञ भारत दवंगे साहेबांनी नैसर्गीक शेती करतानां पिकांवरील किडी व रोगांच्या नियत्रंणासाठी औषधी व फवारण्या याविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या शेवटी प्रभारी मुख्य शास्रज्ञ श्री.शैलेश देशमुख साहेबांनी नैसर्गीक शेती व रासायनीक शेती यांची सांगड घालून पारंपारीक शेती,पशुधन व्यवस्थापण,शेतीसाठी जैविक खतांचा वापर करून मृदु सुधारणा व संवर्धनातुन शेतीचे फायदे व तोटे तसेच नैसर्गीक शेतीसाठी आवश्यक बाबी,शासनाच्या योजना व ध्येयधोरण विवीध योजना यावर मार्गदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप झाला.

या कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्र,बाभळेश्वर येथील शास्रज्ञ,अधिकारी तसेच मंडळ कृषि अधिकारी,लोणी येथील मंडळाधिकारी श्री.प्रशांत वाकचौरे,कृषी पर्यवेक्षक श्रीमती वैशाली अडसुरे,कृषि सहाय्यक श्री.सचिन शिंदे,श्री.प्रदीप वांढेकर,श्री.राहुल उगले,श्रीमती शिला लाटे यांसह गोगलगांव शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे