नागरिकांच्या व सुरक्षा कर्मचारी यांच्या सतर्कतेमुळे दरोडेखोर पकडण्यात यश

लोहगाव वार्ताहर
राहाता तालुक्यातील प्रवरानगर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कारखाना 
येथील कामगार सांस्कृत भवन समोरील कारखाना वसातीमध्ये नागरिकांच्या सतर्क मुळे दरोडा घालणाऱ्यांचा प्रयत्न फसला
 याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रवरनगर वसाहतीमध्ये उस संशोधन शास्त्रज्ञ डॉक्टर योगेश थोरात हे राहात असून मंगळवारी रात्री एक च्या सुमारास यांच्या निवासस्थानाजवळ आलेल्या दरोडेखोरांनी त्यांच्या दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करीत असताना थोरात कुटुंब जागी झाले दरवाजेचा तोडण्याचा आवाज येतात त्यांनी कारखाना सुरक्षा विभागात फोन करून या घटनेबाबत संपर्क केला असता सुरक्षा कर्मचारी व मुख्य सुरक्षा अधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यांनी लगेच लोणी पोलीस स्टेशन संपर्क करून सदर घटनेबाबत माहिती दिली
 सुरक्षा अधिकारी नंदकुमार डेंगळे व त्यांचे सहकारी व गोडाऊन कॉन्ट्रॅक्टर संतोष जायभाय व त्यांचे कर्मचारी दादा खाडे गोल्हार हे कर्मचारी डॉक्टर योगेश थोरात यांच्या निवासस्थानी जवळ पोहचताच कोणीतरी आल्याची कल्पना येतात दरोडेखोर तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु दोन दरोडेखोर पकडण्यात येथील नागरिकांना व सुरक्षा रक्षकास यश आले बाकीचे दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले . दोन दरोडेखोरांना नागरिकांनी व सुरक्षा कर्मचारी यांनी लोणी पोलीस स्टेशनचे यांच्या ताब्यात देण्यात आले
 डॉक्टर योगेश थोरात हे वेळेस सावध झाल्यामुळे दरोडेखोरांचा प्रयत्न फसला सहा दरोडेखोरंपैकी दोन जण पकडण्यात सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांना व नागरिकांना यश आले आत्तापर्यंत लोणी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत बऱ्याच ठिकाणी दरोडे चोऱ्या झाल्या परंतु त्याचा अद्याप कुठलाही तपास लागलेला नाही
 नागरिकांच्या व सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे दरोडेखोर हाती लागले याबद्दल परिसरातील नागरिकांनी सदर नागरिकांचे व सुरक्षारक्षकाचे कौतुक केले आहे

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे