शिर्डी ( प्रतिनिधी) सध्या चीनमध्ये कोरोणाचा प्रादुर्भाव परत वाढला असून देशातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आतापासूनच सर्वत्र तयारी सुरू झाली आहे. ताजमहल मध्ये कोरोना चाचणी झाल्याशिवाय प्रवेश मिळणार नसल्याचे आज वृत्त आहे. तसेच आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी संस्थानच्या जवळपास सर्वच विभागांची या पार्श्वभूमीवर बैठक बोलावत या बैठकीत कोरोना प्रतिबंध उपाय योजना तसेच कोरोनाचा चीन मध्ये वाढत असलेला प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर भाविकांची संस्थान प्रशासनाने तसेच भाविकांनी स्वतःची घ्यावयाची काळजी यावर विचार विनिमय करण्यात आला. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी आणि नियम पाळण्याचे आवाहन भाविकांना करत मास्क वापरावा असे सुचविण्यात आले आहे. मात्र याबाबत कुठलाही लेखी आदेश अथवा साई दर्शनाला येताना मास्क अनिवार्य आहे. असी कुठलीही प्रेस नोट साईबाबा संस्थानच्या वतीने अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली नसल्याने पत्रकारांच्या प्रश्नावर भाविकांनी कोरोना बाबत काय काळजी घ्यावी .याबाबत प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आवाहन केले असता काही प्रसार माध्यमांनी अतिउत्साहीपणा करत राज्यभरात बातम्या प्रसिद्ध केल्या आणि सकाळपासून भाविक मास्क लाऊन दर्शनाला येत असल्याचे म्हटले. मात्र यामुळे भाविकांमध्ये सुद्धा मास्क अनिवार्य झाला की काय..? किंवा साई मंदिर कोरोनामुळे पुन्हा बंद होते की काय..? असा संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. मात्र साई संस्थान प्रशासनाने अद्याप तरी असा निर्णय घेतला नसल्याचे दिसून येत आहे कारण तशी प्रेस नोट किंवा तसेच जाहीर केले नाही.
सध्या नाताळ सण तोंडावर आलाय आणि 31 डिसेंबरच्या तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता साईबाबा संस्थान प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज केली असून भाविकांना सर्व सोयी सुविधा देण्यास संस्थान प्रशासन सज्ज असल्याचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले आहे. तरी मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांनी सावधगिरी म्हणून आवश्यक असणारे मास्क परिधान करावे, तसेच बुस्टर डोस घ्यावा असे आवाहन साई संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव यांनी केले आहे.
0 Comments