बाभळेश्वर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पा. विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न!

लोहगाव (प्रतिनिधी)राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा 21 वर्षांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
बाभळेश्वर येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालयाच्या सन 2000 -2001 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेत एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. या मेळाव्यासाठी
आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे ढोल ताशे व फटाक्याच्या गजरात तसेच फेटे बांधून पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविकि मध्ये सर्व दिवंगत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदाची सूचना श्री नंदू सदाफळ यांनी मांडली तसेच त्यास अनुमोदन जुबेर शेख यांनी दिले .सदर कार्यक्रमामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी आपले मनोगत अतिशय उत्स्फूर्तपणे व्यक्त केले व शाळेच्या जीवनातील आलेले अनुभव व तसेच प्रतिकूल परिस्थितीत त्यातून घेतलेली शिकवण याबद्दल आपले विचार मांडण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री.देठे सर तसेच जेजुरकर सर यांनी आपली शिक्षणाविषयी भूमिका मांडत असताना बदलत्या शिक्षण पद्धती विषयी माहिती दिली. श्री देठे सर यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे तसेच येणाऱ्या नवीन पिढीला मोठ्या प्रमाणावरती तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे .गरजेचे असल्याचे अधोरेखित केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरता सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिनेश गदिया यांनी केले तसेच आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षक वृद्धांचे आभार श्री शंकर रोकडे यांनी मानले.
यावेळी नीलोफर शेख, प्रिया विखे , संजय रोकडे,शितल चेचरे,ज्योती आभाळे, अंबिका खोसे, अनिता बोराडे,संदीप जाधव गणेश खर्डे, इम्रान पठाण, विशाल बनसोडे,योगेश तांबे,सचिन सोनवणे विकास शेळके, संजय गुंजाळ, पुंजाहरी बेंद्रे, योगेश डोंगरे, संदीप डोंगरे, राजेंद्र बेंद्रे ,राजेश कालेकर ,रावसाहेब माकोणे, प्रदीप दंडवते, प्रशांत ब्राह्मणे सोपान डूबे, सुनील गुंजाळ, सतीश म्हसे, दीपक कोकाटे, सुनील बेंद्रे, जुबेर शेख, संतोष बाभुळके, ज्ञानदेव थोरात संदीप गुंजाळ, विजय खोबरे संदीप वेताळ आदी सर्वजण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे