येसगाव शिवरात दोन ट्रकची समोरासमोर धडक! एक जण ठार !एक जखमी!

कोपरगाव (प्रतिनिधी)
 कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात आज रविवारी दुपारी अडीच तीन वाजेच्या दरम्यान दोन अवजड मालवाहतूक ट्रकांची आमने सामने धडक होऊन जबरदस्तअपघात झाला आहे.
 या अपघातात एक जण गंभीर जखमी तर एक जण जागीच ठार झाला आहे.
हा अपघात जबरदस्त होता की दोन्ही मालवाहतूक ट्रकचे समोरासमोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. एका ट्रक वरील चालक ठार झाला असून जखमीला रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान कोपरगाव पोलीस घटनास्थळी पोचले असून या अपघातामुळे परिसरातील नागरिक ही मोठ्या संख्येने येथे जमा झाले .त्यांनी ही मदत केली असल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे