शिर्डी विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित राहता तालुक्यातील लोहगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा लोणी येथे महसूलमंत्री नामदार विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न!

लोहगाव ( प्रतिनिधी)भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोणी येथे शिर्डी मतदार संघातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा सन्मान सोहळा महसुल, दुग्धविकास व पशुसंवर्धन तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील, जि.प.माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील ,माजी मंत्री आणासाहेब म्हस्के पाटील व खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विखे पाटील यांची बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणारी लोहगाव ग्रामपंचायत ॲड. बाबासाहेब कुंडलिक चेचरे, विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे मा, तज्ञ संचालक भाऊसाहेब कुंडलिक चेचरे यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या लोहगाव ग्रामपंचायत सरपंच शशिकांत पठारे, उपसरपंच दौलत चेचरे, सदस्य. दीपक सोनवणे , अशोक चेचरे,सौ शालिनी चेचरे, सौ.अश्विनी कांबळे, सौ. अनिताा गिरमेे, सौ उज्वला वांगे. बळीराम चेचरे, सौ अनिता तांबे, स्वप्निल इनामके, सौ प्रतिभा गवई, अदींचा सत्कार करण्यात आले. 
       याप्रसंगी भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, संगमनेर चे तालुका अध्यक्ष सतीश कांनवडे,विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू, प्रवरा बँकेचे अध्यक्ष अशोक राव म्हसे, मा.सभापती बबलु म्हस्के,शालीराम होडगर, ऍड रोहिणी निघूते,कविता लहारे,नंदा तांबे,यांच्या सह भाजपचे पदाधिकारी व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य ,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
  तसेच माननीय नामदार साहेब यांचाच लोहगाव मधील दुसरा पॅनल केरुनाथ पाटील चेचरे यांच्याही पॅनलचे सत्कार करण्यात आले. तसेच तंटामुक्ती अध्यक्ष शांताराम चेचरे, प्रवरा कारखान्याचे माजी संचालक लहानु पाटील चेचरे, माजी उपसरपंच सतीश गिरमे व सुरेश चेचरे, अण्णासाहेब चेचरे, रावसाहेब चेचरे, संजय चेचरे, बाळासाहेब दरंदले, प्रसाद गायकवाड, बाबासाहेब वांगे आदींचे लोहगाव ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे