कु. रेवा हिला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी लहान थोरांची गर्दी! मुलगा जसा घरचा दिवा तशी मुलगी ही घरची पणती समजून अनेकांनी पुढील उज्वल आयुष्यासाठी तिला दिले आशीर्वाद!

लोहगाव ( प्रतिनिधी)
सध्या कोरोना नंतर विविध कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरे होत असून लग्न, साखरपुडा ,घरभरणी, विविध उद्घाटने मोठ्या स्वरूपात होत असतानाच वाढदिवसही आता मोठ्या व धुमधडाक्यात साजरे होत आहेत. असाच धुमधडाक्यात कु. रेवा या लहान मुलीचा प्रथम वाढदिवस समारंभ बुधवारी 11 जानेवारी 23 रोजी सायंकाळी प्रवरानगर तालुका राहता येथील शांतिनाथ मंगल कार्यालयात प्रवरा शिक्षण संस्थेचे अजीव संचालक माननीय श्री शांतिनाथ शेठ आहेर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला. महेश गौतम सुरडकर व समस्त सुरडकर परिवार यांच्या वतीने कुमारी रेवा महेश सुरडकर हिचा प्रथम वाढदिवस साजरा होत असताना कुमारी रेवा हिला अनेक छोट्या मोठ्या व्यक्तींकडून पुढील आयुष्यासाठी उज्वल यशासाठी शुभेच्छा व आशीर्वाद देण्यात येत आहेत. मुलगा हा घरचा जसा दिवा समजला जातो तशी मुलगी ही घरातील एक पणती आहे. मुलांप्रमाणेच आता मुलींचेही वाढदिवस मोठ्या थाटात साजरे होत आहेत. ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. मुलगा आणि मुलगी ही समसमान म्हणत माता-पिताही आता आपल्या लाडक्या मुलीला मुलाप्रमाणे जीव लावताना दिसतात. येत्या काही वर्षापासून हा समाज रचनेत बदल झालेला दिसून येत असून तो मोठा अभिनंदनही आहे. आज मुली सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. शिक्षणातही मुली बाजी मारत आहेत. त्यामुळेच लहानपणापासूनच मुलींना शुभेच्छा व आशीर्वाद पुढील उज्वल यशासाठी मिळत राहो हीच सर्वांची सदिच्छा आहे. रेवा या छोट्या मुलीलाही तिच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आहेत. तिला अधिकाधिक आयुष्य मिळून ती यशाच्या उंच शिखरावर जावो , अशाच आशीर्वाद रुपी तिला सदिच्छा आहेत. शुभेच्छा आहेत आशीर्वाद आहे. उपस्थितांचे स्वागत महेश गौतम सुरडकर व रुपाली महेश सुरडकर यांनी केली

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे