रविवारी सकाळी श्री म्हसोबा महाराज यांना जलाभिषेक करण्यात आला. येथील कावडी धारकांनी गोदावरी नदीतून गोदाजल पायी घेऊन आल्यानंतर सकाळी कावड धारकांचे ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले. व नंतर मिरवणुकीने येथील मंदिरात येत श्री म्हसोबा महाराजांना जलाभिषेक करण्यात आला. दुपारी चार वाजता काठीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून संध्याकाळी सात वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. यात्रेनिमित्त श्री म्हसोबा महाराज मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त सकाळपासूनच भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करताना दिसून येत होते. यात्रेचे यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी व्यवस्थित नियोजन केले असून सर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत आहेत. सर्व भाविकांनी सर्व ग्रामस्थांनी यात्रेस प्रतिसाद द्यावा, दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे अवाहान यात्रा उत्सव मंडळाकडून करण्यात आले आहे.
0 Comments