राहाता तालुक्यातील लोहगाव येथे ग्रामपंचायतीने विज बिल भरले नसल्यामुळे गेल्या आठ दिवसापासून गावाला पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. विहिरीत असून पोहऱ्यात नाही .अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी मुबलक आहे. मात्र तांत्रिक कारणामुळे पिण्याचे पाणी पुरवठा गेल्या आठ दिवसापासून गावाला होत नसल्यामुळे नागरिक ,महिला त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
राहाता तालुक्यातील लोहगाव येथे गेल्या आठ दिवसापासून ग्रामपंचायतीकडून होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद आहे.ऐन उन्हाळ्यात पिण्याचे पाणी येत नसल्यामुळे नागरिक मोठे त्रस्त झाले आहेत. पाणी मुबलक आहे. मात्र ग्रामपंचायतीने वीज बिल भरले नसल्यामुळे वीज पुरवठा तोडण्यात आल्याचे समजते. त्यामुळे पाणीपुरवठा ही बंद आहे. पाणीपुरवठा होत नसल्यामुळे पिण्याचे पाण्याचे हाल होत आहेत. ज्यांच्याकडे कुपनलिका किंवा विहिरी आहेत त्यांचे ठीक आहे. मात्र ज्यांच्याकडे स्वतःच्या कूपनलिका, विहीर नाही त्यांना पाण्यासाठी वण वण फिरावे लागत आहे. ग्रामपंचायतीने खरंच विज बिल भरले नाही का ?भरले असेल तर वीज पुरवठा किंवा पाणीपुरवठा का होत नाही? जर विज बिल भरले नसेल तर ते का भरले नाही? पिण्यासाठी गावाला वेठीस धरले जात आहे का? असे अनेक सवाल आता येथील
लोहगाव भागातील नागरिकांकडून, महिलांकडून उपस्थित होत आहेत. उन्हाळा सुरू होण्याच्या सुरुवातीलाच पिण्याच्या पाण्याची अशी तांत्रिक चुकीमुळे समस्या निर्माण होऊ लागली तर पुढे एप्रिल, मे महिन्यात भर उन्हाळ्यात नागरिकांची काय परिस्थिती होईल! याची नागरिकांमधून मोठी चर्चा होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने त्वरित ही नागरिकांची समस्या दूर करावी. पिण्याचा पाण्याचा पुरवठा ताबडतोब सुरू करावा. याकडे राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्वरित लक्ष घालून या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत. ग्रामपंचायत कडून पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास येथील नागरिक, महिला ग्रामपंचायतीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. असा इशाराही येथील नागरिक, महिला वर्गातून देण्यात येत आहे.
0 Comments