भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालया समोरील गतिरोधक बनताहेत मृत्यूचे सापळे



कोल्हार (प्रतिनिधी) स्पीड ब्रेकर नव्हे,हे तर बोन ब्रेकर-अपघातांना आळा घालण्यासाठी शहरासह राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक उभारण्यात आले असताना मात्र राहाता तालुक्यातील कोल्हार येथील कोल्हार लोणी घोटी रस्त्यावर असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालया समोरील गतिरोधक हा मृत्यूचा सापळा बनतानाचे चित्र दिसून येत आहे 
   याबाबत सविस्तर वृत्त असे की कोल्हार पंचक्रोशीत शैक्षणिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण असलेल्या या महाविद्यालय परिसरात 
भगवती माता विद्या मंदिर व प्राथमिक व माध्यमिक विद्यालय,एच.एस.सी.व्होकेशन कोर्स,कनिष्ठ महाविद्यालय आणि कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय असल्याने येथे नेहमी वर्दळ असते मात्र या महाविद्यालया समोरील गतिरोधक पुर्णपणे सपाट झाले असल्याने येथे अपघात होऊन मृत्युचे प्रमाण वाढले आहेत.आयआरसी च्या निकषानुसार गतिरोधक बाबत निकष ठरविण्यात आले आहेत की त्यात एकाच रस्त्यावर दोन स्पीड ब्रेकर उभारताना त्यात ठराविक अंतर असावे गतिरोधक उभारल्यानंतर त्यावर थर्मी प्लास्टिक पेंन्ट पट्या पांढरे पट्टे काढणे आवश्यक आहे शिवाय वाहनचालकांना समजण्यासाठी ४० मिटर आधीच सुचनाफलक असणे आवश्यक आहे गतिरोधकची उंची ४ इंच असणे आवश्यक आहे दोन्ही बाजूला दोन दोन मीटर थोडी जागा सोडलेली असावी कारण वाहन चालकांची गती कमी होत जाते आणि वाहनांना झटका बसत नाही मात्र हे सर्व नियम येथील  गतिरोधकचा अनुभव घेतल्यानंतर मोडकळीस आले ‌असल्याचे जाणवते नुकतेच येथे योग्य दिशादर्शक सुचना फलक नसल्यामुळे एका अवजड वाहन ट्रकचा अपघात झाला असून नागरिकांना त्याचा त्रास होताना दिसत आहे 
प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचे बोलले जाते तसेच हा गतिरोधक नियमबाह्य आहे की काय?असा प्रश्न येथील लोकांना पडू लागला आहे यासंबंधी शासनाने आखुन दिलेल्या धोरणाची पायमल्ली होतांना दिसते या गतिरोधकची ‌उंची वाढवून तेथे पांढरे पट्टे,थर्मी प्लास्टिक पेंन्ट पट्या, सुचना फलक त्वरित लावण्यात अशी मागणी संतप्त विद्यार्थी आणि नागरिकांकडून होत आहे.                         सार्वजनिक बांधकाम विभागाने सूचना फलक न लावल्याने वारंवार आपघाताची मालिका याठिकाणी सूरू आहे यात या विभागाचा हलगर्जीपणा हेच मुख्य कारण असल्याचे वाहनचालक व साथानिकांचे मत आहे यासंदर्भात बांधकाम विभागाने तात्काळ जागे होत आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांसह वाहनचालकांमधून होत आहे

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे