मुरबाड मध्ये होऊ घातलेल्या २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंचथेट सरपंच पदासाठी १०६ अर्ज दाखल! तर सदस्य पदासाठी ४०५ नामनिर्देशन पत्र दाखल ! विशेषतः गावपातळीवर ७ ग्रामपंचायतचे थेट सरपंच बिनविरोध! आता लक्ष छाणणी व माघारीकडे!
मुरबाड दि.२१(बाळासाहेब भालेराव) मुरबाड तालुक्यात होऊ घातलेल्या २९ ग्रामपंचायत निवडणूक तसेच १३ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यामध्ये १६ ऑक्टोंबर ते२० ऑक्टोंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची तारीख होती. परंतु मुरबाड मध्ये १६व १७ तारीख वगळता १८,१९,२० या तीन दिवसात २९ थेट सरपंच पदासाठी १०६ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत . त्यामध्ये काचकोली, कलंभे, सोनगाव,कोरावळे,महाज, माजगाव,कासगाव यासह ७ ग्रामपंचायतीचे थेट सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत.तर २९ ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी ४०५ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.पंरतु लक्ष २३ ऑक्टोंबर ला छाननी तर २५ ऑक्टोबरला माघारीचा शेवटचा दिवस आहे याकडे तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या नजरा लागल्या आहेत त्यानंतरच तालुक्या त चित्र स्पष्ट होणार आहे परंतु दाखल झालेले अर्ज यावरून चित्र स्पष्ट होते की तालुक्यात राजकीय रंग निवडणुकीला येणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत वातावरण तापू लागले आहे.
0 Comments