बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्रा अंतर्गत कार्यरत असणाऱ्या केव्हीके प्रवरा कम्युनिटी रेडिओ केंद्राच्या माध्यमातून नवदुर्गा आपल्या भेटीला हा विशेष कार्यक्रम करण्यात आला सादर! श्रोत्यांनी केले कौतुक!

बाभळेश्वर (प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्रांतर्गत सन 2009 पासून कार्यरत असणाऱ्या 90. 8 मेगावॅट के.व्ही. के प्रवरा कम्युनिटी रेडिओ अंतर्गत नवदुर्गा आपल्या भेटीला यावर विशेष उपक्रम नुकताच नवरात्रीत राबवण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत सन 2009 पासून येथे 90. 8 केव्हीके प्रवरा कम्युनिटी रेडिओ कार्यरत असून या रेडिओ केंद्राच्या माध्यमातून विविध प्रकारचे कार्यक्रम ,निर्मिती आणि प्रसारण करण्यात येत असते .याचाच एक भाग म्हणून स्त्री -पुरुष समानता या विषयावर हिंसा  नो या प्रकल्पांतर्गत जागर श्री शक्तीचा या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून नवदुर्गा आपल्या भेटीला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदरचा कार्यक्रम संस्थेच्या माननीय सौ शालिनीताई विखे पाटील( माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अहमदनगर) यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला .कार्यक्रमाची सुरुवात घटस्थापनेच्या दिवसापासून सुरू करण्यात आली. यामध्ये नव्या माळेपर्यंत रोज विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या नवदुर्गांना आमंत्रित करण्यात आले .यामध्ये सौ वंदना अडसूळ ,दीपा आहेर, ब्रह्मकुमारी आशा दीदी ,डॉक्टर सुधा कांकरिया, डॉक्टर दीप्ती भंडारी, डॉक्टर पडघन ,डॉक्टर स्वाती म्हस्के ,डॉक्टर वैशाली म्हस्के, कांताताई आहेर ,आशाताई दंडवते, यांनी सहभाग नोंदवला. सदर कार्यक्रमाचे राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील,यांनी अभिनंदन केले आहे. या उपक्रमांतर्गत प्रसारित झालेल्या कार्यक्रमाबाबत मोठ्या संख्येने श्रोत्यांनी सुद्धा सक्रिय सहभाग घेऊन अभिप्राय नोंदवला व या कार्यक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रयोजक लोणी येथील मे. सोपान निवृत्ती मैड ज्वेलर्स यांनी केले. या कार्यक्रमात सूत्रसंचालन या केंद्राच्या कार्यक्रमाधिकारी सौ. गायत्री म्हस्के यांनी केले. हा कार्यक्रम येथील केव्हीके प्रवरा कम्युनिटी रेडिओ अंतर्गत नवदुर्गा आपल्या भेटीला या विशेष कार्यक्रमात सादर करण्यात आला. नऊ दिवस हा कार्यक्रम सादर करण्यात आला. प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला भरभरून साथ दिली. या कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर येथील प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!